मालामाल कॅसिनोवाले सरकारचे २१ कोटी देणार कधी? दोन कंपन्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:20 IST2026-03-17T10:20:03+5:302026-03-17T10:20:30+5:30

विधानसभेत लेखी माहिती

when will the wealthy casino owners give the government Rs 21 crore action against two companies | मालामाल कॅसिनोवाले सरकारचे २१ कोटी देणार कधी? दोन कंपन्यांवर कारवाई

मालामाल कॅसिनोवाले सरकारचे २१ कोटी देणार कधी? दोन कंपन्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील कॅसिनो व्यवसायातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असला तरी काही कॅसिनो कंपन्यांकडून अजूनही तब्बल २१ कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी येणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षाच्या कालावधीत कॅसिनोंकडून सरकारला एकूण १,७४९ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

उत्तरात नमूद केलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण २३ कॅसिनो असून यातील १७ जमिनीवर व ६ कॅसिनो हे पाण्यामध्ये आहेत. या जमिनीवरील कॅसिनोपैकी 'बिग बी लेजर' या कॅसिनो कंपनीकडून १४ कोटी रुपये येणे बाकी आहे तर 'रॅफल्स स्क्वेअर डेव्हलपमेंट' या कंपनीच्या कॅसिनोंकडून ७ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे.

सरकारकडील थकबाकीच्या प्रकरणात रॅफल्स स्क्वेअर डेव्हलपमेंट या कंपनीला २ मार्च २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

बिग बी लेजरचा परवाना निलंबित

दुसऱ्या प्रकरणात सरकारने बिग बी लेजर या कंपनीचा कॅसिनो परवाना निलंबित केला आहे. यासंदर्भात ८ डिसेंबर २०२५ रोजी आदेश जारी करण्यात आला होता. यानंतर १७फेब्रुवारी २०२६ रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना कॅसिनो परिसर सील करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार संबंधित कॅसिनो परिसर सध्या सील करण्यात आला आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येणार असून ती जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यात येईल, अशी माहिती संबंधित खात्याकडून देण्यात आली आहे.

वर्षमिळालेला महसूल (कोटीमध्ये)
२०२१-२२१८६ कोटी ३५,५७,३९३
२०२२-२३३५३ कोटी ७८,४४,१४१
२०२३-२४६०३ कोटी ७६,७१,५५६
२०२४-२५४६१ कोटी ७१,१५,१९१
२०२५-२६१४३ कोटी ७०,५५,६२६
एकूण१७४९ कोटी ३२,४३,९०७

Web Title : कैसीनो वाले सरकार को 21 करोड़ रुपये कब देंगे?

Web Summary : गोवा के कैसीनो पर सरकार का ₹21.05 करोड़ बकाया है। दो कंपनियों, बिग बी लेजर और रैफल्स स्क्वायर डेवलपमेंट के खिलाफ कार्रवाई। बिग बी लेजर का लाइसेंस निलंबित, रैफल्स स्क्वायर को नोटिस। सरकार को कैसीनो से पांच वर्षों में ₹1749.32 करोड़ का राजस्व मिला।

Web Title : When will casino owners pay ₹21 crore to the government?

Web Summary : Goa casinos owe the government ₹21.05 crore. Two companies, Big B Leisure and Raffles Square Development, face action. Big B Leisure's license is suspended, and Raffles Square received a notice. The government collected ₹1749.32 crore in revenue from casinos over five years.