सोमवारी पाऊस काय करणार? हवामान खाते व स्कायमेटचे परस्पर विरोधी अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 22:13 IST2018-06-24T22:12:41+5:302018-06-24T22:13:14+5:30
सोमवारी गोवा व कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संबंधी एजन्सीने वर्तविला आहे.

सोमवारी पाऊस काय करणार? हवामान खाते व स्कायमेटचे परस्पर विरोधी अंदाज
पणजी - सोमवारी गोवा व कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संबंधी एजन्सीने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याने मात्र केवळ काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय हवामान खाते आणि स्कायमेटने सोमवारच्या दिवसासाठी परस्पर विरोधी अंदाज वर्तविले आहेत. हवेत सायक्लोनिक सक्युलेशन क्रिया आढळून आल्यामुळे गोव्यासह कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. कोंकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीलाही पाऊस झोडपणार असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने मात्र केवळ पिवळा अलर्ट जारी केला आहे. काही मोजक्याच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असे म्हटले आहे. त्यामुळे सोमवार हा भारतीय हवामान खात्याच्या आणि स्कायमेटच्या विश्वासहर्तेचाही छडा लावणारा ठरणार आहे.
दरम्यान गोव्यात पाऊस सातत्याने पडत असून रविवारी १२ तासात सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली तर २४ तासात २ इंच पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरी पाऊस २८ इंच एवढा नोंद झाला आहे. पेडणेत सर्वाधिक ३२ इंच पावसाची नोंद झाली आहे.