शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:58 IST

स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले. 

पणजीः गोव्यातील लोक पोर्तुगीज नागरिकत्व स्विकारून विदेशातच स्थायिक होत असले तरी त्याविषयी सरकार काहीच करू शकत नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले. 

भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्यामुळे या विषयी पूर्वीही चिंता व्यक्त केली जात होती आणि आताही केली जात आहे. परंतु हे प्रकार कुणीच रोखू शणार नाहीत. कारण विदेशी नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व सोडणे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मग ते कोणत्याही कारणासाठी असो, नोकरी धंद्यासाठी असो किंवा इतर कारणांसाठी. त्यांनी नागरिकत्व स्वःहून सोडलेले असते. त्यामुळे या बाबतीत सरकार काहीही करू शकतनाही असे त्यांनी सांगितले. विरोधी आमदारांनी संयुक्तरित्या हा प्रश्न विचारला होता. त्यात वेन्झी विएगश, विरेश बोरकर आणि एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश होता. विदेशी भारतीयांच्या समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की विदेशी भारतीयांच्या समस्यांसंबंधी मात्र गोवा सरकार काही तरी मार्ग काढू शकतो. आमदार वेन्झी विएगश यांनी गोव्यात रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे लोक विदेशात जात असल्याचे सांगितले. त्यासाठी नाईलाजाने भारतीय नागरिकत्व त्यांना सोडावे लागते असेही ते म्हणाले. विरेश बोरकर यांनीही त्यांच्या सूरात सूर मिळविताना म्हणाले की त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावे लागू नये. मात्र कायद्यात त्या शिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना विदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय नागरिकत्व सोडून द्यावेच लागते ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत