शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पावसाने झोडपले; नदी धरणांच्या पाण्याची पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:26 IST

पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता

नारायण गावस

पणजी: राज्यात पावसाचा जाेर वाढला असून सर्वत्र पावसाने झाेडपून काढले आहे. राज्यात नद्या, बंधारे तसेच धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. राज्यभरात ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्य हवामान खात्याने येलो अलर्टही जारी केला आहे.

नदी धरणाच्या पाण्याची पातळी वाढली

गेले आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढू लागली आहे. सत्तरीत सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने म्हादई नदीची पातळी वाढली आहे. त्याच प्रमाणे अंजूणे धरणाची पाण्याची पातळी वाढत आहे.  तसेच चाेर्ला घाटात दरडी पडण्याच्या घटना घडत आहे.  अंजूणे धरणाप्रमाणे साळावली, आमथाने, पंचवाडी तसेच इतर धरणांची पाणतळीही वाढत आहे. राज्यातील नद्या उपनद्यांना पुर यायला सुरुवात झाली आहे. बहुतांश भागात शेती बागायती पाण्याखाली  गेल्या आहेत. .याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

ठिकठिकाणी पडझड

गेले आठ दिवस राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.  त्याचप्रमाणे चाेर्ला घाटात तसेच इतर ठिकाणी दरडी काेसळण्याच्या घटना घडल्या आहेत.  जाेरदार पावसाने लाेकांच्या घरावर झाडे पडून नुकसान हाेण्याच्या घटना राज्यभरातून समाेर येत आहेत. अग्निशमन दलाला विविध ठिकाणाहून अशा घटनांचे कॉल येत असून  त्यांच्याकडून ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. 

राज्यात आतापर्यंत ४५ इंच पावसाची नोंद

राज्यात १ जून ते ५ जुलैपर्यंत ४५ इंच पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे. वाळपईत ५५ इंचा पेक्षा जस्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासातही वाळपईत ५.२९ इंच तर सांगेत ४.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल म्हापसा ४.२९ इंच पावसाची नोंद  झाली आहे. राज्यात आज शुक्रवार ऑरेंज अलर्ट असून पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस