शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता खाते मजबूत करणार

By admin | Updated: May 29, 2014 07:17 IST

पणजी : दक्षता खात्यासह या खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागासाठी सरकारने ३१ नव्या पदांची निर्मिती केली आहे.

पणजी : दक्षता खात्यासह या खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागासाठी सरकारने ३१ नव्या पदांची निर्मिती केली आहे. दक्षता खात्यासह यापुढे पोलिसांची स्वतंत्र तपास यंत्रणा (एसआयटी) मजबूत केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत दक्षता खात्यासाठी ३१ पदांची निर्मिती करण्यात आली. या ३१ पदांमध्ये सात पुनर्जीवित करण्यात आलेल्या पदांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दक्षता खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक तक्रारींबाबत जलदगतीने चौकशी होऊ शकत नाही. अनेक प्रकरणे दीर्घकाळ तशीच राहतात. दीर्घकाळ चौकशी सुरू राहणे हा एक प्रकारे संबंधित व्यक्तीचा छळ ठरतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. दोन पोलीस उपअधीक्षक, दोन निरीक्षक, एक उपसंचालक अशा प्रकारची ३१ विविध पदे यापुढे भरली जातील. अनेक पदांवर डेप्युटेशनवर अधिकारी आणले जातील. त्यांना आवश्यक प्रमाणात जागाही उपलब्ध करून दिली जाईल, असे पर्रीकर म्हणाले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी राज्य माहिती आयुक्त नियुक्तीबाबतचा प्रस्ताव आला नाही. सरकारचे माहिती सचिव रजेवर असल्याने पुढील आठवड्यात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल. मात्र, या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीला संबंधित समितीने मान्यता दिली आहे, असे स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी) )