उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थित एनआयटीचा पणजीत पदवी दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 21:57 IST2018-09-25T21:57:32+5:302018-09-25T21:57:56+5:30
राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोव्याचा (एनआयटी) चौथा पदवीदान सोहळा येत्या २८ सप्टेंबरला सकाळी कला अकादमीत आयोजिला आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थित एनआयटीचा पणजीत पदवी दान
पणजी : राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोव्याचा (एनआयटी) चौथा पदवीदान सोहळा येत्या २८ सप्टेंबरला सकाळी कला अकादमीत आयोजिला आहे. या सोहळ्यास खास आमंत्रण उपराष्ट्रपती एम. व्यकंय्या नायडू व राज्यपाल मृदुला सिन्हा उपस्थित असतील, अशी माहिती एनआयटीचे संचालक गोपाळ मुगेरया यांनी मंगळवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एनआयटीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सारनी घोषाला, डॉ. प्रशांत, डॉ. वसंत उपस्थित होते.
गोपाळ मुगेरया म्हणाले, यंदा एनआयटीच्या बी. टेक, एम. टेक व पीएचडीचे पदवीधर मिळून सुमारे १३३ विद्यार्थ्यांचा उपराष्टपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पदवीदान करून गौरविण्यात येईल. यातील ८६ विद्यार्थ्यांना बी. टेकची, ४२ विद्यार्थ्यां एम. टेकची तर ५ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडीची पदवी प्रदान केली जाणार आहे.
एनआयटीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सारनी घोषाला म्हणाल्या, एनआयटीकडून २०१८ या चालू शैक्षणिक वर्षात सिव्हिल व मॅकनिकल या दोन नवीन शाखांची सुरुवात केली आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एनआयटीला कॅम्पस प्लेसमेंटमध्येही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यात कंपन्यांनी बी. टेकमधील ९० टक्के विद्यार्थ्यांना नोक-या दिलेल्या आहेत. तर एम. टेकमधील ६५ टक्के विद्यार्थ्यांना नोक-या मिळालेल्या आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात तीसहून अधिक कंपन्यांनी पदे भरण्यासाठी एनआयटीला भेट दिली होती.