शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बस घुसली झोपड्यात; चौघे मजूर ठार

By पंकज शेट्ये | Updated: May 26, 2024 12:45 IST

त्या अपघातातून सुदैवाने बसमध्ये असलेले प्रवासी सुखरूप बचावल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : भरधाव वेगाने जाणारी खासगी प्रवासी बस शनिवारी मध्यरात्रीनंतर वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मजुरांच्या झोपडीत घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार मजूर जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. झोपडीत घुसलेल्या बसचा चालक अपघातावेळी दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तो जखमी झाल्याने त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल केला आहे. त्या अपघातातून सुदैवाने बसमध्ये असलेले प्रवासी सुखरूप बचावल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरून एक खाजगी प्रवासी बस वेर्णा औद्योगिक  वसाहतीतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन भरधाव वेगात जात होती. त्यावेळी  चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत घुसली. अपघातावेळी झोपडीत नऊ कामगार झोपलेले होते. बस झोपडीत घुसल्याने चार कामगार जागीच ठार झाले तर पाचजण जखमी झाले.  त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली.  विनोद राजपूत (वय 60), राजेंद्र महातो (वय 60), रमेश मंडल (वय 60) आणि अनिल महातो (वय 35) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

ते सर्वजण बिहार येथील होते.  अपघातावेळी बस चालक दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केला आहे. अपघातात जखमी झालेले पाच कामगार 22 ते 25 वयोगटातील आहेत.  अपघातात बसमधील प्रवासी सुदैवाने बचावले.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात