कुंभमेळ्यासाठी आज सुटणार उडुपी-प्रयागराज रेल्वे गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 09:58 IST2025-02-17T09:57:45+5:302025-02-17T09:58:05+5:30
भाविकांना महाकुंभमेळ्याला उपस्थित राहता यावे याकरिता उड्डुपी आणि प्रयागराज जंक्शनदरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुंभमेळ्यासाठी आज सुटणार उडुपी-प्रयागराज रेल्वे गाडी
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: भाविकांना महाकुंभमेळ्याला उपस्थित राहता यावे याकरिता उड्डुपी आणि प्रयागराज जंक्शनदरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी उडुपी - टुंडला जंक्शन मार्गावर धावणार आहे. गाडी क्र. ०११९२ उडुपी - टुंडला जंक्शन विशेष रेल्वेगाडी सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल. ट्रेन टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी दि. १९ रोजी दुपारी १ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११९१ टुंडला जंक्शन येथून गुरुवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ०९:३० वाजता रवाना होईल. ट्रेन तिसऱ्या दिवशी शनिवार, दि. २२ रोजी सायंकाळी ६:१० वाजता उडुपीला पोहोचेल. ही महाकुंभ विशेष गाडी बरकुर, कुंदापूर, मुकांबिका रोड बैंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमठा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, मदन महाल, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन येथे थांबा घेईल.
यात एकूण २० डबे असतील. दोन टियर एसी १ कोच, श्री टायर एसी ५ कोच, स्लीपर १० कोच, जनरल २ कोच आणि एसएलआर २ अशा प्रकारे रचना असेल.