कारच्या धडकेत दोन वर्षीय बालक ठार; रुमडामळ-दवर्ली येथील घटनेने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 12:24 IST2023-05-24T12:22:30+5:302023-05-24T12:24:34+5:30
मंगळवारी रात्री उशिरा अपघात झाला.

कारच्या धडकेत दोन वर्षीय बालक ठार; रुमडामळ-दवर्ली येथील घटनेने हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: रुमडामळ - दवल गृहनिर्माण वसाहतीत कारची धडक बसून झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आहन मेहबूब मुल्ला असे त्या मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा अपघात झाला.
या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल त्याच वसाहतीत राहणाऱ्या ईर्शाद हिंचमणी (वय ३९) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहन हा काल रात्री आपल्या घराबाहेर खेळत होता. खेळत असताना अचानक रस्त्यावर आला. त्यावेळी रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या कारची त्याला जोरदार धडक बसली. यात आहन गंभीर जखमी झाला.
कुटुंबीयांनी वेळीच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पोलिस उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत.