पर्वरी येथील अपघातात दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:23 IST2017-09-27T17:23:17+5:302017-09-27T17:23:31+5:30
पर्वरी येथे केटीएम शोरूमजवळ दुचाकी आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

पर्वरी येथील अपघातात दुचाकीस्वार ठार
म्हापसा - पर्वरी येथे केटीएम शोरूमजवळ दुचाकी आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीवन कुलासो हा २३ वर्षिंय युवक आपल्या अॅक्टीवा स्कूटर क्रमांक जीए ०३ एडी ३६२८ वरून मित्र मोसीन फर्नांडीस सोबत पणजीहून म्हापशाला जात होता. केटीएम शोरूमजवळ मागून येणाºया ट्रक क्रमांक जीए ०४ टी ११६० ने दुचाकीला जोराने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार जीवन कुलासाचा तोल गेला आणि त्याचे डोके जमिनीवर आपटले आणि गंभीर जखमी झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या त्याच्या मित्राला मोसीन फर्नांडीसला किरकोळ जखमा झाल्या. दोघा जखमीना ताबडतोब बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. इस्पितळात पोहोचल्यावर डॉक्टरानी दुचाकीस्वार जीवन कुलासो याला मृत घोषित केले. तर मोसीन फर्नांडीसवर वैद्यकीय उपचार चालू आहेत.
पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ट्रकचालक राजकुमार टांकसाळे याला निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक केली आहे. मृत दुचाकीस्वार जीवन कुलासो हा मंगळूर येथील असून तो पिळर्ण सेमीनारीत रहात होता. पोलीस उपनिरिक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहेत.