दुचाकी चोरट्यांना गजाआड करून चोरलेल्या तीन दुचाकी केल्या जप्त

By पंकज शेट्ये | Updated: July 6, 2023 20:41 IST2023-07-06T20:40:56+5:302023-07-06T20:41:03+5:30

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

Two-wheeler thieves were caught and three stolen two-wheelers were seized | दुचाकी चोरट्यांना गजाआड करून चोरलेल्या तीन दुचाकी केल्या जप्त

दुचाकी चोरट्यांना गजाआड करून चोरलेल्या तीन दुचाकी केल्या जप्त

वास्को: वेर्णा पोलीसांनी बुधवारी (दि.५) दोन दुचाकी चोरट्यांना गजाआड करून त्यांच्याकडून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या. दुचाकी चोरी प्रकरणात अटक केलेला सोहेल शेख (वय १९) आणि बलराम दास (वय २२) बºयाच महीन्यापासून वेर्णा भागात राहत होते अशी माहीती पोलीसांनी दिली.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी उशिरा रात्री सोहेल शेख आणि बलराम दास यांना अटक करून त्यांनी चोरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या. सोहेल आणि बलराम यांच्याकडून जप्त केलेल्या त्या तीनही दुचाकी वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भागातून चोरीला गेल्या होत्या. सोहेल आणि बलराम यांच्याकडून जप्त केलेल्या त्या दुचाकीपैंकी एक दुचाकी ३ जुलैला चोरीला गेली असून चोरीला जाण्याच्या दोन - तीन दिवसापूर्वीच त्या दुचाकीच्या मालकाने ती नव्याने खरेदी केली होती अशी माहीती पोलीसांनी दिली. तर इतर दोन दुचाकी काही महीन्यापूर्वी चोरीला गेल्या होत्या.

चोरी प्रकरणात अटक केलेला सोहेल हा कर्नाटक तर बलराम हा कलकत्ता येथील मूळ रहीवाशी असून गेल्या काही महीन्यापासून ते वेर्णा भागात रहायचे. वेर्णा पोलीसांनी अटक केलेल्या त्या दोन चोरट्यांचा अन्य कुठल्या दुचाकी चोरी प्रकरणात अथवा इतर गुन्ह्यात हात आहे काय त्याबाबतही पोलीस विविध मार्गाने चौकशी करित आहेत. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

 

Web Title: Two-wheeler thieves were caught and three stolen two-wheelers were seized