पर्रा येथील स्वयंअपघातात दुचाकी चालक जागीच ठार

By काशिराम म्हांबरे | Updated: September 20, 2023 12:37 IST2023-09-20T12:37:22+5:302023-09-20T12:37:51+5:30

अपघातावेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने तो बराच वेळ पडलेल्या अवस्थेत दुर्लक्षित झालेला.

Two-wheeler driver killed on the spot in car accident in Parra goa | पर्रा येथील स्वयंअपघातात दुचाकी चालक जागीच ठार

पर्रा येथील स्वयंअपघातात दुचाकी चालक जागीच ठार

म्हापसा : आज बुधवार सकाळी  5 च्या दरम्यान  पर्रा  - साळगाव रस्त्यावर दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या स्वयंं अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे. ताहिर खान (28, खोर्ली, म्हापसा) असे दुचाकी चालकाचे  नाव आहे. त्याचे दुचाकीवरील  नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या गटारात जाऊन कोसळली. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली.

अपघातावेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने तो बराच वेळ पडलेल्या अवस्थेत दुर्लक्षित झालेला. ताहिर सांगोल्डामध्ये कामाला असून तो आपली रात्रपाळीची ड्युटी संपवून सकाळी घरी परतत असताना ही घटना घडली. डोळा लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याबाजूला असलेल्या गटारात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास म्हापसा पोलिसांच्या वतीने सुरू आहे.

Web Title: Two-wheeler driver killed on the spot in car accident in Parra goa