शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कार अपघातात गोव्यात नौदलाचे दोन अधिकारी ठार: एकजण गंभीर जखमी

By सूरज.नाईकपवार | Updated: June 1, 2024 15:36 IST

उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत.

मडगाव: नौदलाचे दोन अधिकारी गोव्यातील सासष्टी तालुक्यातील नुवे येथील बगलमार्गावर आज शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात घटनास्थळीच ठार झाले तर त्यांचा अन्य एक सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सदया बांबोळीतील गोमेकॉत उपचार चालू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत.स्वीफ्ट कारने ते तिघेही प्रवास करत होते. जो जखमी झाला आहे तो कार चालवित होता. तर त्याच्या सिटाशेजारी अन्य एकजण बसला होता तर तिसरा पाठीमागील सीटवर बसला होता. उत्तर गोव्यात ते आले होते तेथून परतीच्या प्रवासाला निघाताना पहाटे हा अपघात झाला. कार चालवित असल्याचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने रस्ताशेजारील सिमेंट ब्लॉकला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजली. नंतर पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचानामा करुन नंतर पुढील कायदेशीर सोपास्कार केले. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस