शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुयेतील पाणी प्रकल्पाने मांद्रेची तहान भागणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:54 IST

आमदार आरोलकर यांच्यासह ३० एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मांद्रे मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली पाणीसमस्या कायमची दूर क करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे. तुये आयटीआय परिसरातील ३० एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प मांद्रेवासीयांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचे लवकरात लवकर लोकार्पण करून जनतेची तृष्णा भागवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत तुये हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असताना त्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत ३० एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत धावता आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पाण्याची समस्या पूर्णपणे सुटण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, या प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरच समस्या मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. येथील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

आरोग्य सुविधांत सुधारणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे शंभर टक्के सहकार्य मिळत असल्यामुळे मांद्रे मतदारसंघाचा झपाट्याने विकास शक्य होत आहे. तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक झाल्याने आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. तसेच येणाऱ्या काळात रवींद्र भवनाची पायाभरणी, एक्वेरियम प्रकल्प, क्रीडा मैदान, तसेच तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीला जोडणारा लिंक रस्ता पूर्ण केला जाणार आहे.

किमान १२ तास होणार नियमित पाणीपुरवठा

आमदार जीत आरोलकर म्हणाले, आपण आमदार झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्याटप्प्याने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तुये आयटीआय परिसरात हा महत्त्वाकांक्षी ३० एमएलडी पाणी प्रकल्प साकार होत आहे. मार्च महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, त्यानंतर मांद्रेवासीयांना किमान १२ तास नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tuyem Water Project to Quench Mandrem's Thirst: CM Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant expressed confidence that the 30 MLD water project at Tuyem ITI will solve Mandrem's long-pending water issue. The project is nearing completion, promising at least 12 hours of daily water supply. Development projects, including hospital upgrades and infrastructure, are also underway in Mandrem.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतWaterपाणीState Governmentराज्य सरकार