डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमितच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून आदरांजली

By पूजा प्रभूगावकर | Published: April 14, 2024 01:55 PM2024-04-14T13:55:19+5:302024-04-14T13:57:24+5:30

आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला दरवर्षी मुख्यमंत्री व समाज कल्याण खात्याचे मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतात. मात्र यंदा लोकसभा निवडणुकी निमित आचारसंहिता लागू असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही.

Tributes paid by dignitaries in the event of Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमितच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून आदरांजली

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमितच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून आदरांजली

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा: पणजी येथील आंबेडकर उद्यानात शासकीय पातळीवर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमितच्या कार्यक्रमात मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गील, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर, समाज कल्याण खात्याचे , एससी व ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी व अन्य उपस्थित होते. समाज कल्याण खात्याने वतीने आंबेडकर जयंतीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सचिव सरप्रीत सिंग गील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला दरवर्षी मुख्यमंत्री व समाज कल्याण खात्याचे मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतात. मात्र यंदा लोकसभा निवडणुकी निमित आचारसंहिता लागू असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. दरम्यान सरकारने मागील वर्षी राज्यात आंबेडकर भवन उभारण्याचे आश्वासन देत , त्यासाठी जागा निश्चित केल्याचे नमूद केले होते. मात्र आंबेडकर भवन उभारण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही.

Web Title: Tributes paid by dignitaries in the event of Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.