शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

सापांच्या विषाची गोव्यात मोठ्या प्रमाणात तस्करी

By admin | Updated: June 20, 2014 02:42 IST

राजेंद्र केरकर ल्ल केरी गोव्यातल्या गुन्हा अन्वेषण खात्याने काल वाळपई-सत्तरी येथे सर्पविषाची तस्करी करण्यात गुंतलेल्या महंमद सलीम शेख याला शिताफीने अटक केल्याने इथे

राजेंद्र केरकर ल्ल केरी गोव्यातल्या गुन्हा अन्वेषण खात्याने काल वाळपई-सत्तरी येथे सर्पविषाची तस्करी करण्यात गुंतलेल्या महंमद सलीम शेख याला शिताफीने अटक केल्याने इथे सापांच्या विषाची तस्करी करण्याच्या धंद्यात अडकलेल्यांचे बिंग उघडकीस आलेले आहे. गोव्यात यापूर्वी बऱ्याचदा सापांच्या विषाची तस्करी करण्याच्या धंद्यात गुंतलेल्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती; परंतु असे असताना काहीजण घरात किंवा बागायतीत आलेल्या सापांना पकडून त्यांचे विष काढून त्रयस्थ व्यक्ती किंवा टोळीमार्फत विषाची विक्री करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. कातड्यांच्या निर्यातीसाठी सापांची जशी भारताच्या अन्य प्रांतात शिकार होते, अगदी त्याचप्रमाणे विषासाठी सापांना पकडण्याचा व्यवसायही छुप्यारितीने गोव्यात कार्यरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पुणे येथी सिरम इन्स्टिट्यूट, चेन्नई येथील किंग इन्स्टिट्यूट आणि विष प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या बऱ्याच प्रयोगशाळांना असे विष विकले जायचे. सर्पतज्ज्ञ रॉम व्हिटॅकर यांच्या मते, पकडून आणलेले साप मातीच्या थंड मडक्यात ठेवतात आणि काही वेळाने सापाची मान मागच्या बाजूने पकडून त्याला रबराच्या एका तक्त्यावर सरळ ठेवतात. त्या वेळी संतापलेला व घाबरलेला साप आपला बचाव करण्यासाठी रबरी तक्त्याला चावतो, तेव्हा त्याचे विष बाहेर येते. ते विष वाळवून त्याची भुकटी करून ते विकण्यात येते. गोव्यात आॅगस्ट २०१२ मध्ये फोंडा पोलिसांनी विषाच्या तस्करीत गुंतलेल्या एका टोळीला अटक करण्यात यश मिळवले होते. त्या वेळी पोलिसांनी या टोळीकडून सापाच्या विषाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना ९३० मिली विष हस्तगत केले होते. काल गुन्हा अन्वेषण खात्याने घातलेल्या छाप्यात पोलिसांनी एक लिटर सापाच्या विषासह महंमद शेख याला अटक केली असून या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे आणि सापाच्या विषाविषयी शास्त्रीय माहिती असलेल्या तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी झाली तर साप पकडण्याच्या आणि त्यांना जीवदान देण्याच्या नावाखाली वावरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होईल. डिचोली येथील अ‍ॅनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे अमृत सिंग यांनी सापांच्या विषाच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याबरोबर त्यांना अशा विषाचा इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या स्रोतांचा रितसरपणे शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी यापूर्वी शेख याला दोन बाटली सापांच्या विषासह फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्याला पुन्हा एकदा गोव्याच्या गुन्हा अन्वेषण खात्याने अटक खुद्द वाळपईत करण्यात आल्याने या परिसरात वावरत असणाऱ्या टोळीमार्फत त्याने हे कृत्य केले असले पाहिजे. सत्तरीतील म्हादई अभयारण्यात राजनाग, नाग, मण्यार, फुरसे, घोणस अशा एकापेक्षा एक जहरी सापांसाठी नैसर्गिक अधिवास असल्याने अशा गुन्हेगारी टोळीमार्फत सापांचे विष क्रूररितीने काढण्याचे तंत्र अवगत केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा अन्वेषण खात्याने राष्ट्रीय स्तरावर वन्य जीव प्रकरणातील गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या संस्थेची मदत घेतली तर अशा प्रकरणांच्या मुळाशी जाणे शक्य होईल.