नाताळात विशिष्ठ उद्दिष्ट्य ठेवून येणारे पर्यटक, पोलिसांची होते दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 18:01 IST2018-12-25T18:01:07+5:302018-12-25T18:01:16+5:30
नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांचा लोंढा गोव्यात दाखल झाला असला तरी आलेल्या पर्यटकांनी, गैरप्रकार करु नये, दंगा मस्ती करु नये, दारु पिवून किनाऱ्यावर जावू नये यासाठी पोलिसांनी पर्यटकांवर करडी नजर ठेवली जात आहे.

नाताळात विशिष्ठ उद्दिष्ट्य ठेवून येणारे पर्यटक, पोलिसांची होते दमछाक
म्हापसा : नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांचा लोंढा गोव्यात दाखल झाला असला तरी आलेल्या पर्यटकांनी, गैरप्रकार करु नये, दंगा मस्ती करु नये, दारु पिवून किनाऱ्यावर जावू नये यासाठी पोलिसांनी पर्यटकांवर करडी नजर ठेवली जात आहे. किनाºयावर दारु पिवून जाण्यास किंवा दारु घेवून किनाºयावर जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी दरवर्षी गोव्यात येणारे लाखोंनी पर्यटक खा, प्या, मजा करा या उद्देशाने येतात. यंदाही पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. खास करुन जगप्रसिद्ध अशा कळंगुट परिसरातील किनाºयावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. मागील दोन दिवसापासून या भागातील गर्दीत वाढ होत गेली आहे. आलेल्या पर्यटकाची जास्त पर्यटकांचा रोख फक्त किनारी भागावरच असतो. त्यातून पर्यटकांच्या गर्दीने भरुन गेलेल्या किनारी भागातील पर्यटन व्यवसाय सुद्धा तेजीत चालत असतो.
मंगळवारी पहाटे पासून कळंगुट किनाºयावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यात विदेशी पर्यटकांपेक्षा देशी पर्यटकांचा समावेश जास्त प्रमाणात आहे. पहाटेपासूनच पर्यटक किनाºयावर यायला सुरुवात झाली असल्याने माहिती तेथील व्यावसायिकांनी दिली. पर्यटक लवकर येत असल्याचे ठाव असल्याने व्यवसायिकांनी आपली दुकाने लवकर सुरु करुन व्यवसायाला सुरुवात केली होती. खास करुन मद्य विक्रेत्या व्यावसायिकांनी तर व्यवसायाला लवकर सुरुवात केली होती. त्यांच्या दुकानांवर बरीच गर्दी आढळून आली.
वाढती गर्दी व त्यातून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी किनाºयावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलेला आहे. यात साध्या वेषातील पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. किनाºयावर प्रवेश करणाºया व्यक्तींची तैनात पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. हातात किंवा जवळ दारुच्या बाटल्या बाळगल्यास त्यांना किनाºयावर जाण्यापासून प्रवृत्त केले जात असून दारुचे सेवन केलेली एखादी व्यक्ती किनारी आढळल्यास त्याला पाण्यात उतरण्यापासून मनाई केली जात आहे.
किनाºयावर असलेल्या लाईफ गार्डकडून किनाºयावर दक्षता बाळगली जात आहे. पाण्यात तसेच पाण्याबाहेर सुद्धा त्यांच्या गस्ती सुरुच आहेत. पाण्यात स्नानासाठी उतरलेल्या लोकांना ठरावीक अंतराच्या बाहेर जाण्यापासून या गार्डसकडून मनाई केली जात आहे. त्यांच्या सेवेत अडथळे आणणाºयांवर कारवाई सुद्धा केली जात आहे. काही गार्डसकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्यटकांकडून सहकार्य लाभत नसले तरी पोलिसांकडून मिळत असलेल्या सहकार्याच्या जोरावर त्यांना नियंत्रणात ठेवले जात असल्याचे सांगितले. किनाºया सोबत रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत.