टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डी.लिट.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:05 IST2026-03-15T13:04:17+5:302026-03-15T13:05:17+5:30

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आदर्शावर आधारित प्रतिष्ठित संस्थेकडून हा सन्मान स्वीकारताना मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.

tilak maharashtra vidyapeeth pune conferred d litt to goa cm pramod sawant | टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डी.लिट.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डी.लिट.

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी : पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ४४ व्या पदवीदान समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मानद 'डी. लिट.' पदवीने सन्मानित करण्यात आले. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आदर्शावर आधारित प्रतिष्ठित संस्थेकडून हा सन्मान स्वीकारताना मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. किशोरी आमोणकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर अशा दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळाल्याची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हे विद्यापीठ मुख्यमंत्र्यांचे 'अल्मा मेटर' (माजी १ शैक्षणिक संस्था) असल्याने, आपल्याच संस्थेकडून मिळालेला हा बहुमान त्यांनी गोव्यातील जनता, आपले गुरुजन आणि शिक्षकांना समर्पित केला.

या सोहळ्यात ए. महेशकुमार रेड्डी आणि हेमंत २ ओबेरॉय यांनाही मानद 'डी. लिट.' पदवी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांचे ज्ञान, जिद्द आणि बांधिलकी राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकांच्या विश्वासानेच आपल्याला सार्वजनिक सेवेची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
 

Web Title : गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत को तिलक विश्वविद्यालय से डी.लिट् की उपाधि

Web Summary : गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत को तिलक महाराष्ट्र विश्वविद्यालय के दीक्षांत समारोह में डी.लिट् की उपाधि से सम्मानित किया गया। सावंत ने यह सम्मान गोवा की जनता और शिक्षकों को समर्पित किया। उन्होंने संस्थान की विरासत और प्रतिष्ठित हस्तियों के बीच अपना स्थान पाकर कृतज्ञता व्यक्त की। उन्होंने अन्य प्राप्तकर्ताओं और स्नातकों को बधाई दी, और राष्ट्र निर्माण में युवाओं की भूमिका पर जोर दिया।

Web Title : Goa CM Pramod Sawant Receives D.Litt. from Tilak University

Web Summary : Goa's Chief Minister Pramod Sawant was honored with a D.Litt. degree at Tilak Maharashtra University's convocation. Sawant dedicated the honor to Goan people, teachers, and expressed gratitude, acknowledging the institution's legacy and his place among distinguished figures. He congratulated fellow recipients and graduates, emphasizing the youth's role in nation-building.