शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

आदेश टाइप करायलाही कर्मचारी नाही

By admin | Updated: May 27, 2014 01:36 IST

पणजी : मुख्य माहिती आयुक्त म्हणून लीना मेहेंदळे यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन आता सात महिन्यांचा काळ लोटला; पण सरकारच्या प्रशासकीय पातळीवरून त्यांना हवे

पणजी : मुख्य माहिती आयुक्त म्हणून लीना मेहेंदळे यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन आता सात महिन्यांचा काळ लोटला; पण सरकारच्या प्रशासकीय पातळीवरून त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नसल्याने अजूनही आयुक्तालयाला अनेक मूलभूत अडचणींचा व समस्यांचा सामना करावा लागत आहे. अजूनही पाटो येथील केवळ ८० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत मेहेंदळे यांचे कार्यालय चालते. हे कार्यालय यापुढे ३०० चौरस मीटर जागेत हलविले जाणार आहे. ती जागा अजून पूर्णत: तयार झालेली नाही. गेल्या वर्षी २३ आॅक्टोबर रोजी मेहेंदळे यांनी पदभार स्वीकारला होता, तेव्हा त्यांना सरकारकडून अनेक आश्वासने देण्यात आली होती; पण त्यापैकी बरीच आश्वासने ढिम्म प्रशासनामुळे मूर्त स्वरूपात आलेली नाहीत. मेहेंदळे यांच्या दिमतीला पुरेसे मनुष्यबळ नाही. अनेकदा जास्त महिला कर्मचार्‍यांनाच त्यांच्या कार्यालयात काम करण्यासाठी पाठवले जाते. या कर्मचारी वारंवार रजेवर जातात. मेहेंदळे यांनी एखाद्या प्रकरणी आदेश दिल्यानंतर तो आदेश टाइप करण्यासाठी कर्मचारी नाही. त्या आदेशाचा कोकणी-मराठीत अनुवाद करण्यासाठी किंवा संकेतस्थळावर तो आदेश उपलब्ध करण्यासाठीही कर्मचारी नाही, अशा प्रकारच्या अडचणींचा सामना अजूनही माहिती आयुक्तालय करत आहे. माहिती आयुक्तालयाच्या अनेक शिफारशींची प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही. सरकारी खात्यांच्या संकेतस्थळावर सुमोटो पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी म्हणून माहिती हक्क कायद्यातील कलम चारची अंमलबजावणी केली जावी, अशी माहिती आयुक्तालयाची शिफारस आहे; पण त्या शिफारशीचे पालन केले जात नाही. सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून ते संगणकीकृत केले जावेत म्हणूनही मेहेंदळे यांनी प्रशासनास पत्रे लिहिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. मेहेंदळे यांनी ताबा घेतला तेव्हा मोठ्या प्रमाणात आव्हान अर्ज प्रलंबित होते. ते निकालात काढण्याचे काम त्या करत आहेत; पण पुरेसे मनुष्यबळ नाही ही डोकेदुखी आहे. आयुक्तालयाची वेबसाइट सक्रिय करून द्यावी ही मेहेंदळे यांची अपेक्षाही शासकीय यंत्रणा पूर्ण करू शकलेली नाही. माहिती हक्क कायद्याबाबत प्रशासन संवेदनशील नाही, अशा प्रकारचा अनुभव मेहेंदळे यांना येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी खात्यांमधील अनेक माहिती अधिकारी लोकांना माहिती देण्याबाबत टाळाटाळ करतात. त्यासाठी ते पळवाटा शोधतात. फाइल हरवली आहे, माहिती उपलब्ध नाही, अशा सबबी सांगितल्या जातात व त्यामुळे अर्जदारांना माहिती आयुक्तालयाकडे जावे लागते. (खास प्रतिनिधी)