शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही; मंत्रिमंडळ फेररचना शक्य: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 13:47 IST

'भरती आयोग' मोडीत काढणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'कर्मचारी निवड आयोग मुळीच रद्द करणार नाही. तसेच नोकऱ्या विक्रीच्या बाबतीत कोणीही सुटणार नाही. आतापर्यंत ३० जणांना अटक झालेली आहे. या सर्वांविरुध्द आरोपपत्रे सादर केली जातील. तसेच माझ्या परिवाराची बदनामी करणाऱ्यांवर शंभर टक्के अब्रूनुकसानीचे खटले घालणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते. नोकऱ्या विक्री प्रकरणात सुरवातीला मीच संशयिताला पकडून दिले. परंतु माझ्या परिवाराची बदनामी चालली आहे. अबकारी घोटाळा प्रकरणात जामिनावर सुटलेले लोक माझ्या परिवारावर आरोप करत आहेत. त्यांना मी सोडणार नाही. बदनामीचा खटला दाखल करणार म्हणजे करणारच, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, सुलेमान याने उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यावरही आरोप केले आहेत त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, चोर आपल्या बचावासाठी आमदारावर आरोप करतोय त्याला किती महत्त्व द्यायचे? या प्रकरणात सुलेमान मुळीच सुटणार नाही. सुलेमानचे पलायन तसेच त्यात पोलिसही सहभागी असल्याच्या आरोपांनंतर गृह खात्याच्या कारभारावरुन संताप व्यक्त केला जात आहे, त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, सुलेमानला गोवा पोलिसांनीच कर्नाटकमधून पकडून आणले होते. त्यानंतर त्याचे घरही जमीनदोस्त केले. त्याच्यावर शक्य तेवढी कारवाई केली. परंतु विरोधक मानायला तयार नाहीत.

व्हिडीओ कुठून आला याची चौकशी होणार क्राइम ब्रँचच्या कोठडीतून पळालेल्या सिद्दिकी ऊर्फ सुलेमानला पोलिस शंभर टक्के पकडून आणतील, असा दावा गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. त्याचबरोबर सुलेमानचा व्हिडीओ कुठून आला. त्याने तो कोणाला पाठवला त्यांचीही चौकशी केली जाईल. डीजीपींनी काय ते योग्यरित्या स्पष्ट केलेले आहे. या प्रकरणी तपासकाम चालू आहे.

दरम्यान, विरोधकांना सुलेमानचा पुळका दिसतोय. तो त्यांचा नातलग आहे की त्याला राजकीय पक्षात घेणार आहात? असा प्रश्न करुन मुख्यमंत्री म्हणाले की, भू- बळकाव प्रकरणात १०० ते १५० गुन्हे नोंद झाले. माझ्या सरकारने प्रथमच कारवाई आरंभली. तर एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, कोणी चुकूनही शेतजमीन खरेदी केली असेल तर बांधकामासाठी सनद दिली जाणार नाही म्हणजे नाही.

मंत्रिमंडळ फेररचनेला काही कालावधी लागेल 

राज्यात नेतृत्त्व बदलाचा प्रश्नच नाही. कारण तसा कोणताही पेचप्रसंग घडलेला नाही. सर्व काही सुरळीतपणे चालले आहे. मंत्रिमंडळ फेररचना मात्र होईल. परंतु त्यासाठी काही कालावधी लागेल. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मंत्रिमंडळ बदल करायचा झाला तरी केंद्रीय नेत्यांशी सल्लामसलत करुनच तो केला जाईल. मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट केले जातेय. माझे विरोधक माझ्या बदनामीसाठी पैसा खर्च करत आहेत. व्टिटर, टूल कीटच्या माध्यमातून हे सर्व चालले आहे.

मोदींच्या धोरणानुसारच...

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कर्मचारी निवड आयोग स्थापन करुन मी नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणली. काही मंत्री, आमदार त्यावर नाराजी असतीलही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भाजपशासित सर्वच राज्यांमध्ये अशा प्रकारचे आयोग स्थापन करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारचा तो धोरणात्मक निर्णय आहे. मंत्री, आमदारांना काय वाटते हे महत्त्वाचे नाही. राज्याचे हीत माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तरुण, तरुणींना पारदर्शक पद्धतीनेच नोकऱ्या मिळायला हव्यात. इतर राज्यांमध्ये कोणालाही आयोगाची अडचण वाटलेली नाही. मग येथेच का वाटावी? आमदार म्हणून निवडून येण्यासाठी नोकऱ्यांची खिरापत वाटण्याची मुळीच गरज नाही. तसे असते तर ४० टक्के नवीन चेहरे विधानसभेत निवडून आलेच नसते. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत