कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद

By काशिराम म्हांबरे | Updated: December 15, 2023 16:36 IST2023-12-15T16:34:24+5:302023-12-15T16:36:15+5:30

कळंगुट येथील परबोवाडा येथे असलेल्या श्री वाठारी देवस्थानात चोरट्यानेमागील बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश् करून चोरी केली.

Theft in a temple in Calangute in goa | कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद

कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद

काशीराम म्हांबरे,म्हापसा: बार्देश तालुक्यातील मंदिरात चोरी होण्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. कळंगुट येथील परबोवाडा येथे असलेल्या श्री वाठारी देवस्थानात चोरट्यानेमागील बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश् करून चोरी केली.  मंदिरात इतर मौल्यवान वस्तू न सापडल्याने शेवटी चोरट्याने घंटा चोरुन नेण्याचा पराक्रम केला.

या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी कळंगुट पोलीस स्थानकावर दाखल केलेल्या तक्रारीनुसार घटना १२ डिसेंबर रात्री ११ ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या दरम्यान घडल्याचे म्हटले आहे. चोरट्यांने चोरी करण्याचा केलेला प्रकार तेथील सीसीटीव्हीत  कैद झाला आहे.

चोरट्याने मंदिराच्या मागील  मागील दरवाजातून प्रवेश केला. पूर्ण मंदिर फिरल्यानंतर आत असलेली पितळीची घटां काढून तो फरार झाला. पोलिसांकडून या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार गोविंद पटनाईक पुढील तपास करीत आहे. पीर्ण तसेच पर्रा परिसरातील मंदिरात चोरीचा प्रकार यापूर्वी घडलेला.

Web Title: Theft in a temple in Calangute in goa