गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ३७ वर्षीय रशियन तरुणाला दोन रशियन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अलेक्सी लिओनोव्हवर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी उत्तर गोव्यातील अरमबोल येथे एलेना कास्तानोव्हा या त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह, त्यांच्या भाड्याच्या खोलीत आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित तरुणीचा गळा कापला गेला होता आणि तिचे हात दोरीने बांधलेले होते.
दरम्यान, शेजाऱ्यांनी काही ओरडा-ओरड ऐकल्यानंतर घरमालकाला कळवले आणि घटनास्थळी धाव घेतली. तेवढ्यात, लिओनोव्ह पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून गेला, मात्र, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने केवळ या हत्येचीच नव्हे तर, मोरजीम गावात सापडलेल्या एलेना वानेवा या एका दुसऱ्या रशियन तरुणीच्या हत्येचीही कबुली दिली.
गोवा पोलिसांच्या मते, वानेवाची हत्या १४ जानेवारीच्या रात्री झाली होती. महत्वाचे म्हणजे, दोन्ही हत्या एकाच पद्धतीने करण्यात आल्या होत्या. गळा कापणे आणि हात बांधणे. चौकशीदरम्यान, लिओनोव्हने इतर अनेक खूनांची कबुली दिली. यात गोव्याबाहेरील प्रकरणांचाही समावेश आहे. त्याने आसाममधील एका ४० वर्षीय तिसऱ्या महिलेच्या हत्येसंदर्भातही पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने या महिलेला मादक पदार्थ देऊन मारल्याचा दावा केला आहे. तथापि, आरोपी वारंवार त्याचे जबाब बदलत आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तो दीर्घकाळ ड्रग्जच्या प्रभावाखाली असू शकतो. यामुळे, सर्व दाव्यांची सत्यता तपासली जात आहे.
आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी -माध्यमांतील वृत्तांनुसार, या प्रकरणात आतापर्यंत दोन रशियन महिलांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. तिसऱ्या प्रकरणाची पुष्टी पोस्टमॉर्टम आणि पुराव्यांद्वारे अद्याप होणे बाकी आहे. गोवा पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हत्येचे आरोप नोंदवले आहेत. पेरनेमच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन रशियन महिलांच्या हत्येप्रकरणी लिओनोव्हला १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. तपास यंत्रणा पुरावे गोळा करत आहेत. आरोपीच्या दाव्यांची पुष्टी झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे एका पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे.
Web Summary : A Russian man in Goa was arrested for murdering his partner and another woman. He confessed to both killings, describing similar methods. The accused also claimed involvement in another murder in Assam, but police are verifying his statements due to potential drug influence.
Web Summary : गोवा में एक रूसी व्यक्ति को अपनी साथी और एक अन्य महिला की हत्या के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने दोनों हत्याओं की कबूली दी, जिसमें समान तरीकों का वर्णन किया गया। आरोपी ने असम में एक और हत्या में शामिल होने का भी दावा किया, लेकिन पुलिस नशे के प्रभाव के कारण उसके बयानों की पुष्टि कर रही है।