शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 'भविष्य' झाले सुरक्षित; 'ईपीएफ'चा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:45 IST

अपवादात्मक स्थितीत मुख्य अभियंत्यांना निवृत्तीनंतर मुदतवाढ.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील सुमारे ७,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) योजनेचा लाभ मिळणार आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम खाते, पेयजल व मलनिस्सारण खाते, वीज खाते आणि जलस्रोत खात्यातील मुख्य अभियंत्यांचे निवृत्ती वय काही परिस्थितीत ६२ वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'राज्यात २०१७ पासून असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकदाच दिल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत 'ईपीएफ'चा लाभदिला जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे २.५ ते ३ कोटी रुपयांचा भार येईल. यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना ईपीएफ सुविधा देण्यात आली नव्हती.'

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, 'साबांखा, पेयजल, मलनिस्सारण, वीज आणि जलस्रोत खात्यातील मुख्य अभियंत्यांचे निवृत्तीचे वय अपवादात्मक परिस्थितीत ६२ पर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, जेथे पुढील बढती देऊन मुख्य अभियंता बनविण्यासाठी पात्र उमेदवार उपलब्धनसेल, त्या प्रकरणांमध्ये ही वाढ लागू असेल. तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व वर्क-चार्ज कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन संरचना लागू केली जाईल. त्यामुळे तात्पुरत्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या बाबतीत स्थिरता आणि न्याय मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

पशुवैद्यक कॉलेजसाठी भाडे तत्त्वावर जागा

दरम्यान, गोवा कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस महाविद्यालयास कुर्ती आणि कोडार येथे सरकारच्या १ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेची ३३ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर हस्तांतरण करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे पशुवैद्यक आणि पशुविज्ञान क्षेत्रात शिक्षण संधींना चालना मिळेल.

ओबीसीची १९ जातींची नवीन यादी

गोवा राज्य सरकारने पंचायती राज आणि सामुदायिक विकास विभागामार्फत नव्या अधिसूचनेद्वारे राज्यातील काही समाजांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) गट म्हणून स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विशेषतः जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये राजकीय प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाचा लाभदेण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिसूचना जिल्हा पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या संपूर्ण कालावधीसाठी प्रभावी राहणार आहे. अधिसूचनेवर पंचायत संचालनालयाचे संचालक आणि संयुक्त सचिव महादेव आरोंदेकर यांच्या स्वाक्षरीने १० नोव्हेंबर रोजी आदेश जारी केला आहे. सरकारने या अधिसूचनेवर सूचना आणि अभिप्राय dir-gpps.goa@nic.in या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन केले आहे.

आयोगाची शिफारस

या निर्णयामुळे राज्यातील विविध मागासवर्गीय समाजांना स्थानिक पातळीवरील राजकीय सहभागाची संधी वाढणार असून, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाच्च्या अहवाल आणि शिफारसींनुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ओबीसींमध्ये यांचा समावेश

/ नाभिक/नापित / महाले, कोळी /कुंभार (ख्रिस्ती कुंभारसह), तेली, शिंपी, ख्रिस्ती महार, कलईकार / लोहार /कासार, पागी / गाबीत, ख्रिस्ती न्हावी, सतरकर, भंडारी नाईक, धोबी / रजक /मडवळ (ख्रिस्ती धोबीसह), न्हावी / नाई खारवी (ख्रिस्ती खारवीसह), नाथजोगी, गोसावी, धनगर, विश्वकर्मा / च्यारी /मेस्त, ठक्कर, कोमरपंत, ख्रिस्ती रैंदेर.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Contract Workers Secure 'EPF' Benefits: Cabinet Approves Key Decision

Web Summary : Goa's contract workers, approximately 7,000, will now receive Employee Provident Fund (EPF) benefits. The Cabinet also approved raising the retirement age for key engineers to 62 under certain conditions. Nineteen communities included in OBC category for political representation.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत