कारचा आरसा फोडून बॅग पळविली, मुंबईतील व्यापाऱ्याला लाख रूपयांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:10 IST2023-04-10T13:08:55+5:302023-04-10T13:10:24+5:30

१ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पळविला, काब द राम येथील घटना

The bag was stolen by breaking the mirror of the car, the businessman in Mumbai was robbed of lakhs of rupees | कारचा आरसा फोडून बॅग पळविली, मुंबईतील व्यापाऱ्याला लाख रूपयांचा दणका

कारचा आरसा फोडून बॅग पळविली, मुंबईतील व्यापाऱ्याला लाख रूपयांचा दणका

सूरज पवार, मडगाव: गोव्यातील काब द राम येथे अज्ञात चोरटयाने मुंबईतील एका व्यापाऱ्याला दणका देताना कारमध्ये ठेवलेली त्याची बॅग पळवून नेली. कारचा आरसा फोडून चोरटयाने आपली हातसफाई केली. बॅगेत टेब, मोबाईल व सोन्याचे रिंग मिळून १ लाख १० हजारांचा ऐवज होता. चाेरटयांनी त्यावर डल्ला मारला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंसंच्या ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात पुढील तपास करीत आहेत. अमित भागवत हे तक्रारदार आहेत. शनिवार दि. ८ रोजी काब द राम येथे चोरीची वरील घटना घडली. तक्रारदाराच्या महिंद्रा कारचा आरसा फोडून अज्ञात चोरटयाने आतील बॅग पळवून नेली. चोरीची उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे.

Web Title: The bag was stolen by breaking the mirror of the car, the businessman in Mumbai was robbed of lakhs of rupees