शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काणका-म्हापसा येथे मंदिर फोडले

By admin | Updated: March 13, 2015 00:54 IST

बार्देस : काणका-म्हापसा येथील श्री विश्वटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिरात गुरुवार, १२ रोजी रात्री अडीचच्या सुमारास झालेल्या चोरीत

बार्देस : काणका-म्हापसा येथील श्री विश्वटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिरात गुरुवार, १२ रोजी रात्री अडीचच्या सुमारास झालेल्या चोरीत सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराच्या मागीलदाराची कडी आणि लोखंडी ग्रिल्सचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मौल्यवान वस्तू व इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. चार फंडपेट्या फोडून रोकड लंपास केली. चोरट्यांनी आतील एक कपाट फोडले. त्यातील पालखीचे चांदीचे गोंडे घेतले आणि अन्य साहित्य अस्ताव्यस्त टाकले. त्यानंतर बाहेरील सभामंडपाच्या बाजूस असलेल्या मंदिराच्या बाजूच्या दोन्ही खोल्यांची कुलपे तोडली. त्यातील एका खोलीत दोन कपाटे होती. ती फोडून साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. दुसऱ्या बाजूच्या खोलीचेही कुलूप तोडले, त्यातही त्यांना काही सापडले नाही. मंदिरात गर्भकुडीच्या बाहेर मोठी एक, त्याच्याच बाजूला लहान एक, तर बाहेरच्या बाजूला दोन अशा एकूण चार फंडपेट्या आहेत. या चारही पेट्या फोडल्या. मंदिरातील पालखीतील चांदीचे गोंडे, तीन कपाटे फोडून टाकली. मंदिराच्या मालमत्तेची मोडतोड आणि नासधूसही केली. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर व पोलीस शिपाई रामा मातोंडकर यांनी पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी पाहणी केली. (प्रतिनिधी)