तेलंगणातील एकाची  मडगावातील लॉजिंग बोर्डमध्ये आत्महत्या; आर्थिक समस्येमुळे होता तणावाखाली

By सूरज.नाईकपवार | Updated: October 30, 2023 10:45 IST2023-10-30T10:43:44+5:302023-10-30T10:45:17+5:30

आर्थिक समस्येमुळे तो नैराश्य होता व तो दारुही पित होता अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

telangana man commits died at a lodging board in margao | तेलंगणातील एकाची  मडगावातील लॉजिंग बोर्डमध्ये आत्महत्या; आर्थिक समस्येमुळे होता तणावाखाली

तेलंगणातील एकाची  मडगावातील लॉजिंग बोर्डमध्ये आत्महत्या; आर्थिक समस्येमुळे होता तणावाखाली

सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: तेलगंंणा राज्यातील एका ३८ वर्षीय इसमाने गोव्यातील  मडगावातील मालभाट येथील एका हॉटेल लॉजिंग बोर्डमध्ये आत्महत्या केली. चेल्ली मुराली कृष्णा असे मयताचे नाव आहे. आर्थिक समस्येमुळे तो नैराश्य होता व तो दारुही पित होता अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी वरील प्रकरण पोलिस दफ्तरी नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर पुढील तपास करीत आहेत.

रविवारी आत्महत्येची वरील घटना घडली. चेल्ली हा शहरातील एका लॉजिग बोर्डमध्ये रहात होता. तो तणावाखाली होता. रुमच्या टॉयलेटच्या खिडकीच्या ग्रील्सला बेडशीट लावून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर त्या हॉटेल लॉजिंगच्या मालकिणीने या संबधी मडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवला आहे.

Web Title: telangana man commits died at a lodging board in margao