पणजी : सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपालच्या अंतरिम जामिनाची मुदत २७ जूनपर्यंत वाढवली आहे. सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला तेजपाल याने जामिनात आणखी सहा आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एस. खेहर आणि सी. नागप्पन यांच्या व्दिसदस्यीय खंडपीठासमोर त्याची याचिका सुनावणीस आली. तेजपालच्या आईचे निधन झाल्याने क्रियाकर्म करण्यासाठी त्याच्या अंतरिम जामिनाचा कालावधी वाढविण्यात आला. या प्रकरणाचे तपासकाम पूर्ण झालेले असल्याने आता तेजपालच्या कोठडीची काय गरज आहे, असा सवाल न्यायालयाने केला. गोवा पोलिसांच्या वतीने वकिलाने बाजू मांडताना जामिनाची मुदत वाढवून देण्यास विरोध केला. मोकळा सोडल्यास तेजपाल साक्षिदारांना फूस लावू शकतो तसेच पुरावेही नष्ट करू शकतो, अशी भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. आईचे निधन झाल्याने आपली घरात उपस्थिती आवश्यक असल्याचे तेजपालने आपल्या याचिकेत म्हटले होते. (प्रतिनिधी)
तेजपालला २७ जूनपर्यंत दिलासा
By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपालच्या अंतरिम जामिनाची मुदत २७ जूनपर्यंत वाढवली आहे.
तेजपालला २७ जूनपर्यंत दिलासा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}