शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:41 IST2025-09-25T12:39:49+5:302025-09-25T12:41:54+5:30
शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात

शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :शिक्षकांनी नवे उपक्रम व तंत्रज्ञानाबद्दल नेहमीच स्वतः अपडेट राहावे. विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल मार्गदर्शन करताना त्यांचे चांगले चरित्रही घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
भाजपच्या शिक्षक विभागाने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये रोल मॉडेल बनण्यासारखे कार्य शिक्षकांनी करून दाखवायला हवे. विद्यार्थ्यांना शिकवताना जुन्या पद्धती नको. नवे उपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत व्हा. शिक्षकांनी सातत्याने प्रत्येक गोष्टीबाबत अपडेट राहायला हवे. गोवा शंभर टक्के साक्षर बनले आहे. करिअरसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात
संधी आहेत.
सरकार लवकरच कौशल्य अभ्यासक्रम सुरू करणार आहे. सहा वेगवेगळ्या व्यावसायिक महाविद्यालयांचा कॅम्पस स्थापन केला जाईल. राज्यात फॉरेन्सिक सायन्सपासून फिजिओथिएरपी, कायदा शिक्षणासाठी नॅशनल स्कूल ऑफ लॉ आदी सोय आहे. आयुष इस्पितळात गोवेकर विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा राखीव आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.