शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्याविरोधातील आरोप निश्चित, तेजपाल यांचा मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:42 IST

बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्याविरोधातील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तरुण तेजपाल यांना त्यांच्याविरोधात निश्चित करण्यात आलेल्या आरोपींची माहिती देण्यात आली आहे. तरुण तेजपाल यांनी मात्र आपण बलात्काराच्या आरोपात दोषी नसल्याचा दावा केला आहे अशी माहिती सरकारी वकिल फ्रान्सिस्को यांनी दिली आहे.

म्हापसा -  तहलका नियतकालिकाचा संपादक तरुण तेजपाल यांच्या विरुद्ध उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयात आपल्या सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले.  केलेले आरोप तेजपाल यांनी फेटाळले आहेत. या आरोपपत्रावरील पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून त्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात तेजपाल याने केलेल्या अर्जावरील अहवाल अतिरिक्त सत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. 

आपल्या सहकारी कनिष्ठ महिला पत्रकारा विरुद्ध कथित लैंगिक छळ प्रकरणात तहलका नियतकालिकाचा संपादक तरुण तेजपाल विरूद्ध तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रावरील आरोप उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या. विजया पोळ यांच्या न्यायालयात निश्चित करण्यात आले. भादसंच्या कलम ३४१, ३४२, ३५४, ३५४ (ए), ३५४ (बी), ३७६, ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (के) या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले. केलेले आरोप यावेळी तेजपालच्या वतिने फेटाळण्यात आले. केलेले आरोप चुकीचे असून ते राजकीय हेतूने पे्ररित असल्याचा आरोपही यावेळी तेजपालच्या वकिलाने न्यायालयात केला. मागील चार वर्षांपासून प्रकरणावर सरकारकडून सुनावणी घेण्यास विलंब केला जात असल्याचाही आरोप यावेळी केला. 

न्यायालयाने यावेळी तेजपालचे वकिल अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी आरोप निश्चित करण्यास एका महिन्याची स्थगिती देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाजवळ केली होती.  सत्र न्यायालयात खटला चालवण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात केलेल्या अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत आरोप निश्चित करण्यात येऊ नये असा युक्तीवाद त्यांनी केला. केलेला युक्तीवाद सरकारी वकिल फ्रान्सिस ट्रावोरा यांनी केलेल्या मागणीला विरोध केला व आरोपीच्या वेळकाढू धोरणाचा तो एक भाग असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. 

यावेळी आरोपपत्राची प्रत तरुण तेजपाल यांनी सादर करुन खंडपीठात तेजपाल यांनी केलेल्या अर्जावरील सुनावणीचा अहवाल २१ नोव्हेंबरला सादर करावा असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. कारण नसताना आपण ही याचिका लांबवू शकत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. २१ नोव्हेंबरपूर्वी खंडपीठातील सुनावणी पूर्ण झाल्यास अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्रावरील युक्तीवाद सुरु होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. 

सरकारी वकिल फ्रान्सिस ट्रावोरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजपाल विरोधात निश्चित करण्यात आलेले आरोप त्याला समजावून सांगण्यात आले असल्याची माहिती दिली. आरोपीचे वकिल वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याने सुनावणी सुरु होण्यास विलंब होत असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यांच्या वेळकाढू धोरणामुळे चार वर्षांनंतरही आरोपपत्रावरील सुनावणी सुरु होऊ शकली नसल्याचे ते पुढे म्हणाले. 

तेजपालचे वकिल अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी सरकारी वकिलाने केलेले आरोप फेटाळून लावताना केलेल्या मागणीनुसार आरोपपत्रातील अनेक कागदपत्रे आम्हाला वेळेवर देण्यात येत नसल्याने सुनावणीस विलंब होत असल्याचे मत व्यक्त केले. खंडपीठात केलेल्या अर्जावरील योग्य निकाल मिळून आम्हाला न्याय मिळणार अशी अपेक्षा व्यक्त करुन निकाल विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सुतोवात त्यांनी दिले. तसेच न्यायालयाजवळ मागीतलेला वेळ न्यायालयाने नामंजूर केल्या प्रकरणी त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. 

२०१३ साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे ७९ दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीवेळी त्या न्यायालयात उपस्थित होत्या. आरोपपत्रात १५० साक्षीदार नोंद करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. 

अतिरिक्त सत्र न्यायालयात तेजपाल विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची सुनावणी सुरु झाल्यानंतर पहिला साक्षीदार म्हणून कोणाला बोलावण्यात येणार असा प्रश्न सरकारी वकिल फ्रान्सिस ट्रावोरा यांना केला असता त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. ते त्यावेळेच्या परिस्थितीनुरुप अवलंबून राहणार असल्याचे सांगितले.  २१ नोव्हेंबरनंतर सुनावणी होणार किंवा नाही हे सुद्धा सध्या ठोसपणे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. 

पोलिसांनी तेजपालविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. माझ्यावरील आरोप हटवण्यात यावेत, अशी विनंती तेजपाल यांनी वकिलामार्फत केली होती. पण उच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळली. २८ सप्टेंबरला त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात यावी, असे आदेश देण्यात आला होता. न्यायालयाने आरोप निश्चित केले असल्याने आता युक्तिवादाला सुरुवात होईल. 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी पार पडेल.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाCourtन्यायालय