‘निर्दोष’ गुन्हेगारांचा राज्यात सुकाळ

By Admin | Updated: July 22, 2014 07:30 IST2014-07-22T07:23:12+5:302014-07-22T07:30:16+5:30

सद्गुरू पाटील ल्ल पणजी राज्यात एका बाजूने खून, बलात्कार, घरफोड्या, दरोडे, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जास्त गंभीर गोष्ट म्हणजे

Suvala in the state of 'innocent' criminals | ‘निर्दोष’ गुन्हेगारांचा राज्यात सुकाळ

‘निर्दोष’ गुन्हेगारांचा राज्यात सुकाळ

सद्गुरू पाटील ल्ल पणजी
राज्यात एका बाजूने खून, बलात्कार, घरफोड्या, दरोडे, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जास्त गंभीर गोष्ट म्हणजे वार्षिक शेकडो गुन्हेगार मोकाट सुटू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत सर्वच पोलीस स्थानकांच्या कक्षेत झालेल्या गुन्ह्यांच्या तपासानंतर सुमारे ७५ टक्के गुन्ह्यांमधील व्यक्ती या न्यायालयात पुराव्यांअभावी निर्दोष सुटल्या
आहेत. पोलीस यंत्रणेचे हे अपयश चव्हाट्यावर मांडणारा तपशील माहिती हक्क कायद्याखाली उपलब्ध झाला आहे.
राज्यात दोन वर्षांत ९१ खून, १३८ बलात्कार, ४८ खुनी हल्ले, २६३ विनयभंग, ११२ सोनसाखळ्या पळविण्याच्या घटना, असे अनेक गुन्हे घडले आहेत. वाढत्या गुन्हेगारीची समस्या एका बाजूने असताना दुसऱ्या बाजूने खूपच मोठ्या संख्येने गुन्हेगार न्यायालयांमधून निर्दोष सुटू लागले असल्याचे पोलीस खात्यातूनच आरटीआयखाली मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खून, खुनी हल्ले, बलात्कार, चोऱ्या, दरोडे, हुंडा, घरफोड्या अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस सबळ पुरावे सादर करू शकले नसल्याने शेकडो गुन्हेगार निर्दोष सुटल्याचे आकडेवारी स्पष्ट करत आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कक्षेतील आकडेवारी ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.

Web Title: Suvala in the state of 'innocent' criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.