अपहरण प्रकरणात गुजरातमधील संशयित गोव्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 18:59 IST2023-05-27T18:58:04+5:302023-05-27T18:59:34+5:30
अटक चुकविण्यासाठी तो गोव्यात येवून लपला होता.

अपहरण प्रकरणात गुजरातमधील संशयित गोव्यात जेरबंद
वासुदेव पागी
पणजी: अल्पवयीन मुलीचे अपरहण करण्याच्या प्रकरणात गुजरात पोलिसांना हवा असलेला संशयित गोवा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आला.
संशयिताचे नाव हरीष बिल्व असे गुजरातमध्ये गरबाडा पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा गुन्हा त्याच्यावर असून गुजरात पोलीस त्याच्या मागावर होते.
अटक चुकविण्यासाठी तो गोव्यात येवून लपला होता. त्याचे लोकेशन बांबोळी येथे मिळाल्यावर गुजरातहून एक पोलीस पथक गोव्यात दाखल झाले होते. जुने गोवा पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. गुजरात पोलीस त्याला घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.