विकासासाठी साथ द्यावी: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:39 IST2025-05-02T08:37:49+5:302025-05-02T08:39:59+5:30

गुजरात, महाराष्ट्रातील स्थायिकांना आवाहन

support should be given for development said bjp goa state president damu naik | विकासासाठी साथ द्यावी: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

विकासासाठी साथ द्यावी: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपाच्या विकासाच्या झेंड्याला तुम्हा सर्वांची साथ महत्त्वाची आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोव्यात स्थायिक झालेल्या महाराष्ट्र, गुजरातच्या लोकांनी भाजपला, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनादिन आणि गुजरात राज्यदिनानिमित्त पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, राकेश अगरवाल, लता पारेख, अनिल लाड, महाराष्ट्र, गुजरातमधील गोव्यात स्थायिक झालेले इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत कार्यक्रम

दामू नाईक म्हणाले, एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमांतर्गत भाजप विविध राज्याचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. आमची ओळख व्हावी, यासाठी भाजपा वेगवेगळ्या राज्यांत राज्य दिवस साजरा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभर विकासकामे होत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामे राज्यातही होत आहेत. गोव्यात स्थायिक झालेला महाराष्ट्र आणि गुजरातमधील नागरिक आता परराज्यातील नाहीत, तर ते गोमंतकीय आहेत. आम्ही एकमेकांशी कोंकणी बोलतो. त्यामुळे तुमचा पाठिंबा भाजपला असणे गरजचे आहे.

 

Web Title: support should be given for development said bjp goa state president damu naik