शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त मंदिरांची कथा नि व्यथा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:03 IST

उद्ध्वस्त मंदिरांची निश्चिती आता पुरातत्त्व खाते  करणार असल्याची घोषणा नंतर झाली.

- सुभाष वेलिंगकर, माजी संघचालक, गोवा

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या हिंदूंच्या मंदिरांची पुनर्बांधणी करणार असून त्यासाठी गोवा सरकारने २० कोटी रु.ची राशी ठेवल्याची घोषणा झाली आणि जनता आनंदीत झाली. हिंदू मंदिरांसाठी २० कोटी ठेवलेले असतानाच, अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थानांच्या डागडुजीसाठी ५१ कोटी रु.चा निधी ठेवल्याचा फारसा बोभाटा होऊ दिलेला नाही. शिवाय तथाकथित 'झेवियर शवाच्या प्रदर्शनासाठी आणखीन ९२ कोटी रु.ची तरतूद सरकारने करून ठेवल्याचे सर्वज्ञात आहेच. ठीक आहे. पुढची कथा पाहू.

उद्ध्वस्त मंदिरांची निश्चिती आता पुरातत्त्व खाते  करणार असल्याची घोषणा नंतर झाली. पुरातत्त्व खाते या कामाला लागले असून अशा मंदिरांची माहिती गोळा करण्यात ते व्यग्र आहे, अशा बातम्या वृत्तपत्रात यायला लागल्या. जनता खूष झाली! काही काळ गेल्यावर सरकारच्या पुरातत्त्व खात्यानेच अधिकृतपणे जाहीर केले की या खात्याकडे, पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांबद्दल कसलेच पुरावे नाहीत.

त्यानंतर काही काळाने, पुरातत्त्व खात्याने जनतेला साद घातला व उद्ध्वस्त मंदिरांची माहिती आणि पुरावे कुणाजवळ असल्यास त्यांनी रीतसर अर्ज करावेत, असे आवाहन केले. तात्पर्य सरकारने उद्ध्वस्त मंदिरांचे स्वतःच्या खात्यापाशी पुरावे आहेत की नाहीत याची अगोदर खात्री करून न घेताच वरील पॉप्युलिस्ट' घोषणा केली होती.

दरम्यान, दस्तुरखुद्द सरकारनेच गेल्या दहा वर्षांत क्रमाक्रमाने, 'वारसास्थळ म्हणून (१९८३ साली) पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित' संरक्षित म्हणून ताब्यात ठेवलेला फ्रंटिसपीस ऑफ साखवाळ' नावाने परिचित भूखंड चर्चच्या घशात घालण्यासाठी पुरातत्त्व खात्यातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मंदिर उद्ध्वस्त केल्यावर पोर्तुगीज त्या जागेवर चर्च उभारू शकले नाहीत अशी फ्रेटिसपीस ही श्रीक्षेत्र शंखावलीमधील प्राचीन श्रीविजयादुर्गा मंदिराची मूळ जागा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

अजूनही या संरक्षित जागेबद्दलची चर्चधार्जिणी भूमिका सरकारने बदललेली नाही. हे एकदमच विसंगत आहे. म्हणूनच, 'उद्ध्वस्त मंदिरांचे पुनर्निर्माण करू' या सरकारच्या घोषणेवर लोकांचा विश्वास बसलेला नाही. त्यात पुन्हा माघार घेत सरकारने एक नकारात्मक संकेत दिलेला आहे, असे म्हणता येईल. तो म्हणजे एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हल्लीच जोडलेली एक पुस्ती! 'उद्ध्वस्त मंदिरांचा शोध घेऊन या सर्व मंदिरांचे मिळून एकच प्रातिनिधिक 'स्मारक' झाले पाहिजे!' ही ती पुस्ती! (मंदिर नव्हे, स्मारक!)

उद्ध्वस्त मंदिरांच्या जागी त्याच मंदिराचे पुनर्निर्माण करण्याची केलेली घोषणा, कोणत्यातरी दडपणाखाली आता 'विरळ होत चालली आहे काय याची शंका येते. उदध्वस्त मंदिरांचा शोध घेऊन निश्चिती करण्यासाठी एक विशेष समिती सरकारने स्थापन केली. तिला नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आहे.उद्ध्वस्त मंदिरांचे मिळून एका ठिकाणी प्रातिनिधिक 'स्मारक' बांधण्याचा पर्याय हे चक्क पलायन ठरणार आहे. विश्व हिंदू परिषदेने राममंदिराचे पुनर्निर्माण व मथुरा, काशी मुक्त करण्याचे उद्दिष्ट न ठेवता कुठेतरी या तिन्ही मंदिरांचे प्रातिनिधिक 'स्मारक' बांधावे, असे सांगण्यासारखे ते होईल. उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्निर्माणाची घोषणा 'हत्ती पादे, हत्ती पादे फुस्स !' अशी होऊ नये, ही गोव्याच्या जनतेची रास्त अपेक्षा!

 

टॅग्स :goaगोवाTempleमंदिर