सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:34 IST2025-05-28T07:33:07+5:302025-05-28T07:34:29+5:30
साखळी महाविद्यालयात डिजिटल लॅबचे उद्घाटन

सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांच्याच हाती आहे. मोठी स्वप्ने पाहा, धाडसीपणे नावीन्यपूर्ण व्हा आणि डिजिटल भारताचे शिल्पकार बना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथील शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात लिनोवो डिजिटल इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व सरकारी महाविद्यालयांत विविध क्षेत्रातील स्टार्टअप केंद्रे सुरू करण्यात येतील. त्या माध्यमातून कौशल्य विकास, उत्तम संभाषणासह इतर कौशल्ये प्राप्त व्हावीत हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी लिनोवो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र कात्याल उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे. यातून विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, कोडिंग आणि डिझाइनमध्ये भविष्यासाठी तयार कौशल्ये प्रदान केली जातात.
स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने वाटचाल
स्वयंपूर्ण गोवासाठी लिनोवो, भारत केअर्स आणि सीएसआरबॉक्स सोबत भागीदारी करताना तंत्रज्ञान-चलित शिक्षण वाढवण्याचे प्रयत्न आहेत. स्मार्ट क्लासरूम ते कौशल्य प्रशिक्षण, एआय चॅटबॉट्स ते पंचायतींमध्ये ई-गव्हर्नन्सपर्यंत, स्वयंपूर्ण गोवा उभारत आहोत.