शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'अभंग रिपोस्ट'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:48 IST

उसगाव न्हाले भक्तिरसात

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातर्फे टाकवाडा, उसगाव येथील मैदानावर रविवारी (दि.२९) आयोजित केलेल्या 'अभंग रिपोस्ट' कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मंत्री राणे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभकरण्यात आला.

कार्यक्रमाच्या शुभारंभी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजप वाळपई मंडळ समिती अध्यक्ष रामा खरवत, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य समीक्षा नाईक, उसगाव सरपंच राजेंद्र नाईक, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, संजय गावडे, नरेंद्र गावकर, विनोद मास्कारेन्स, विलियम मास्कारेन्स, रेश्मा मठकर, समाज कार्यकर्ते विनोद शिंदे उपस्थित होते.

कसलेच राजकारण न करता युवकांमध्ये असलेल्या ऊर्जा आध्यात्मिक मार्गाकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. युवाशक्ती आणि आमचे विचार वेगळे आहेत. आजपासून युवापिढीत नवी वाटचालीची सुरुवात करीत आहोत. इथे अनेक राजकारणी आम्ही पाहिले, परंतु उसगावातील लोकांना संघटित करण्याचा विचार कुणीच केला नाही, असे मंत्री राणे यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी मुख्य गायक प्रतीश म्हस्के, दुष्यंत देवरुखकर (ड्रम), स्वप्निल तरपे (बास गिटार), अजय वव्हाळ (गिटार), तुषार तोतरे (हार्मोनियम), रोशन आडे (तबला), पी.सू, आचार्य, सुमित शिंदे, अभिजीत चव्हाण व इतर कलाकारांचा मंत्री राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वागत समीक्षा नाईक यांनी केले. प्रास्ताविक सरपंच राजेंद्र नाईक यांनी केले.

सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले, तर रामनाथ डांगी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाळपई भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष रामनाथ डांगी, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू, माजी पंच दिनेश तारी, उसगावचे पंच सदस्य विनोद मास्कारेन्हस, लक्ष्मीकांत नाईक, विदेश नाईक, सुमित नाईक व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

आबालवृद्धांनी धरला ठेका

संतांच्या अभंगावरही तरुणाईला नाचवता येते, शिवाय त्यातून मिळणारा सात्विक आनंद वेगळाच असतो हे 'अभंग रिपोस्ट'ने सिद्ध केले. राज्यात आधुनिक पद्धतीने नवी पिढी अभंगांचा ठेवा जपते, याचा उसगावात अनेकांनी अनुभव घेतला. बँडने युवकांबरोबरच लहानथोरांना विठ्ठल नामाच्या गजरात अक्षरशः ठेका धरायला लावला. आधुनिक वेशभूषा केलेल्या सहा युवकांनी पारंपरिक अभंगांना पाश्चात्य संगीताचा बाज चढवत मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठांच्या काळजाला हात घालत, त्यांना ठेका धरायला, नाचायला आणि फुगड्या खेळायला भाग पाडले. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Abhang Repost' receives enthusiastic response; inaugurated by Minister Vishwajit Rane.

Web Summary : Health Minister Vishwajit Rane inaugurated 'Abhang Repost' in Usgaon. The event successfully blended spirituality and youth energy, drawing a large crowd. Modernized Abhangs captivated all ages, encouraging dancing and celebration, proving the timeless appeal of devotional music.
टॅग्स :goaगोवाartकलाmusicसंगीतcultureसांस्कृतिक