Konkan Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीनिमित्त विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:56 IST2025-12-10T12:55:25+5:302025-12-10T12:56:30+5:30
Christmas and New Year Special Trains 2025: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय

Konkan Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीनिमित्त विशेष गाड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव :नाताळ व नववर्षानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर सीएसएमटी मुंबई ते करमळी, एलटीटी ते तिरुवनंतपूरम, एलटीटी ते मंगळुरू जंक्शन व यशवंतपूर एक्स्प्रेस या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी करमळी विशेष (दैनिक) गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दररोज मुंबई सीएसएमटीहून रात्री १२:२० वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमळीला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दररोज दुपारी १:१५ वाजता करमळीहून सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०११७१ लोकमान्य टिळक (टी)- तिरुवनंतपूरम उत्तर विशेष (साप्ताहिक) ही गाडी गुरुवार १८, २५ डिसेंबर, १ व ८ जानेवारीला लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११:३० वाजता तिरुवनंतपूरम उत्तर येथे पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११७२ तिरुवनंतपूरम उत्तर-लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) तिरुवनंतपूरम उत्तर येथून शनिवार, २०, २७ डिसेंबर, ३ व १० जानेवारीला रोजी दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही ट्रेन तिसऱ्या दिवशी १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०११८५ लोकमान्य टिळक (टी) मंगळुरू जंक्शन विशेष (साप्ताहिक) मंगळवार, १६, २३, ३० डिसेंबर आणि ६ जानेवारीला लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८६ मंगळुरु जं. लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) मंगळुरू जंक्शन येथून १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७ जानेवारीला १३ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी ६:५० वाजता पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०६२६७ यशवंतपूर कारवार एक्स्प्रेस स्पेशल गाडी २४ व २७ डिसेंबरला दुपारी १२ वाजता यशवंतपूरहून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता कारवारला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०६२६८ कारवार - यशवंतपूर एक्स्प्रेस विशेष ही गाडी २५ व २८ डिसेंबरला कारवार येथून दुपारी १२ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ४:३० वाजता यशवंतपूरला पोहोचेल.