सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 15:57 IST2018-09-02T15:57:48+5:302018-09-02T15:57:54+5:30

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी कन्या प्रियांका गांधी यांच्यासह विश्रांतीसाठी गोव्यात आल्या आहेत.

Sonia Gandhi in Goa on private visit | सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात 

सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात 

पणजी : काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी कन्या प्रियांका गांधी यांच्यासह विश्रांतीसाठी गोव्यात आल्या आहेत. हा त्यांचा खासगी दौरा असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये चार दिवसांच्या विश्रांतीसाठी दाखल झाल्या आहेत. पक्षाचे स्थानिक नेते मात्र याबाबत पूर्णपणे अंधारात आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाबू कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘सोनियाजी अधूनमधून विश्रांतीसाठी गोव्यात येत असतात. दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. हा त्यांचा दौरा पूर्णपणे खासगी स्वरुपाचा आहे. त्यामुळे आम्ही कोणीही त्यांची भेट घेतलेली नाही.’

सोनियाजींचा किती दिवस मुक्काम असेल किंवा काय याबाबतही आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sonia Gandhi in Goa on private visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.