शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली फोगाटचा कारस्थान रचून खून; स्वीय सचीव सुधीर सांगवान व साथीदारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 20:50 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट यांच्या मृतदेहावर जखमा आढळल्या आहेत.

वासूदेव पागी

पणजी : भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर हणजूण पोलिसांनी आज सोनालीचा पीए सुधीर सांगवान व त्याचा साथीदार सुखविंदर सिंग यांच्यासह आणखी दोघांविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पीए सांगवान यानेच खुनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय इन कॅमेरा करण्यात आली आहे.

सोनालीचा खूनच झाला असल्याचा दावा करणाऱ्या फोगाट कुटुंबियांना या वाईट प्रसंगात दिलासा देणारा निर्णय हणजूण पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३०२, (३४ )अंतर्गत खुनाचा आणि कारस्थान रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती म्हापशाचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. मृतदेहावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल गोमेकॉकडून बनविण्यात आला आहे, परंतु सोनालीच्या मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात आले आहे. मात्र सोनालीच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या आहेत. 

दरम्यान, आधी खुनाची तक्रार दाखल करा व नंतरच शवचिकित्सा करा, या भुमिकेवर ठाम राहिलेले सोनालीच्या कुटुंबियांनी गुरूवारी सामंजस्य दाखविताना शवचिकित्सेला परवानगी दिली. परंतु या चिकित्सेचे पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले पाहिजे या अटीवर त्यांनी संमती दिलेली. संशयास्पद प्रकरणात गोमेकॉत शवचिकित्सा ही कॅमराबद्धच होत असल्यामुळे फोगोट कुटुंबियांची अट मान्य करणे हे पोलीस व गोमेकॉसाठी नवीन गोष्ट नव्हती. शवचिकित्सेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. 

आणखी चाचण्यासोनालीच्या व्हिसेराची चाचणी करण्याची सूचना गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात आली आहे.तसेच हिस्टोपेथोलॉजिकल आणि सेरोलॉजिकल चाचणी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

पोलीस मुख्यालयातून सूचनापोस्टमार्टम अहवालात जरी खूनाचे कारण स्पष्ट केले नसले तरी हे प्रकरण खून म्हणूनच नोंदविण्याचा निर्णय हा पोलीस मुख्यालयातून सूचना मिळाल्यानंतर घेण्यात आला. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.

रिंकूच्या तक्रारीवरून एफआयआरसोनाली फोगाट यांच्या मृत्यूचे गूढ उकलले नसल्यामुळे निर्माण झालेला संशयकल्लोळ अजून कायम आहे. सोनाली हिला हृदयविकाराचा झटका नव्हे तर तिचा खून केल्याचा तिच्या कुटुंबियांचा दावा कायम आहे. सोनाली हिचा स्वीय सचिव सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर कुटुंबीयांनी ठपका ठेवला आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतही त्यांनीच खून केल्याचा आरोप केला आहे. सोनालीवर विषप्रयोग करून तिला ठार करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आता हणजुण पोलिसांनी दाखल केलेला खुनाचा हल्लाही पोस्टमार्टम अहवालाच्या आधारावर नव्हे तर सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर केला आहे. स्वीय सचिव सुधीर सांगवान व साथीदारास अटकसोनालीच्या शरीरावर आढळून आल्या जखमा

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाDeathमृत्यूPoliceपोलिस