शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

शिक्षकी पेशा सांभाळताना सामाजिक चळवळींचाही वसा; श्रीमती साबिना मार्टिन्स यांचं प्रेरणादायी कार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:27 IST

महिलांचे प्रश्न असोत की विकासाची दिशा ठरविणारा प्रादेशिक आराखड्याचा विषय असो, चळवळ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती मार्टिन्स यांचा नेहमीच पुढाकार असतो. 

पणजी : गेली तब्बल ३१ वर्षे शिक्षकी पेशा सांभाळताना श्रीमती साबिना मार्टिन्स अनेकदा आक्रमक होऊन सरकारविरुद्धही संघर्षाची भूमिका घेत असतात. गोव्याची पेटती मशाल म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा प्रकारे सामाजिक जाणीवेने झपाटून एखादीच महिला पुढे येते. गोव्यात महिलांचे प्रश्न असोत की विकासाची दिशा ठरविणारा प्रादेशिक आराखड्याचा विषय असो, चळवळ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती मार्टिन्स यांचा नेहमीच पुढाकार असतो. तत्परता आणि कणखरपणा, हाती घेतलेल्या कार्यावरील निष्ठा आणि त्यासाठी लागणारी कष्टवृत्ती असे सर्व गुण श्रीमती मार्टिन्स यांच्या अंगी आहेत. ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. चळवळींमध्ये कशा काय आलात या प्रश्नावर साबिना म्हणाल्या की,‘१९८0 साली त्यावेळच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंटस युनियन (पीएसयु) या विद्यार्थी संघटनेतून विविध प्रश्नांवरील आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. कॅपिटेशन फी, विद्यार्थ्यांना बसगाड्यांवर अर्ध्या तिकिटाची मागणी, विद्यापीठ फीवाढ या प्रश्नावर त्यावेळी रस्त्यावर उतरलो. गोव्याच्या वेगवेगळ्या भागात पथनाट्यांमध्येही सहभाग घेतला त्यानंतर संघर्ष नाट्य मंच तसेच सिटिझन्स फॉर सिव्हिल लिबर्टिज अ‍ॅण्ड डेमोक्रेटिक राइटस या संघटनेतही काम केले. ‘बायलांचो साद’ ही संघटना कधी स्थापन केली, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचाराविरुध्द लढा देण्यासाठी १९८६ साली या संघटनेची स्थापना केली. गेल्या १२ आॅक्टोबर रोजी या संघटनेला ३२  वर्षे पूर्ण होत आहेत. गोव्याच्या विकासाची दिशा ठरविणाºया २0२१ च्या प्रादेशिक आराखडा आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग आहे. या एकमेव कारणासाठी स्थापन झालेल्या गोवा बचाव अभियानच्या त्या निमंत्रक आहेत. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की,‘१९८७ साली शिक्षकीपेशा सुरु केला. हायरसेकंडरी आणि सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. रसायनशास्राच्या शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत असून पीएचडीही घेतली आहे. १९९६ साली शारदा मंदिर हायस्कूलमध्ये रुजू झाले. म्हापशातील सेंट झेवियर्स हायरसेकंडरीत दोन वर्षे विद्यादान, वास्कोतही सेंट जोझेफ विद्यालयात शिकविले. नोकरी, व्यवसाय सांभाळून तुम्ही चळवळींना कसा काय वेळ देऊ शकता असे त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘दुपारपर्यंत आपण शाळेत असते त्यामुळे अगदी तातडीचे आणि महत्त्वाचे काही असले तरच आपण त्या कामासाठी बाहरे पडते पण सहसा शाळेकडे दुर्लक्ष करीत नाही. मुलांना शिकविण्याच्या बाबतीत कोणताही परिणाम होणार नाही याबाबत नेहमीच कटाक्ष असतो. अनेकदा खास करुन महिलांवरील अत्याचारांबाबत तातडीने दखल घ्यावी लागते अशावेळी गत्यंतर नसते.’गोवा बचाव अभियानतर्फे प्रादेशिक आराखड्याच्या विषय त्यांनी उचलून धरला. राज्याच्या विकासाची दिशा ठरविणारा हा आराखडा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊनच अंमलात आणावा, अशी त्यांची मागणी आहे. विकासकामे व्हावीत, पण पर्यावरण सांभाळूनच असे त्यांचे म्हणणे आहे.‘बायलांचो साद’ या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेला अध्यक्ष नाही किंवा सचिवही नाही. सरकारचे कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. कार्यकर्त्यांच्या देणग्यांवरच ही संघटना चालते तसेच या संघटनेची नोंदणीसुध्दा नाही. महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत साबिना या फारच संवेदनशील आहेत.  

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार