शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या रुग्णांना गोमेकॉत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:18 PM

पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल.

ठळक मुद्देपणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता केसरकर यांनी हा प्रस्ताव मांडल्याच्या वृत्तास त्यानी दुजोरा दिला

पणजी - पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन या अनुषंगाने चर्चा केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा महाराष्ट्राच्या अन्य भागातील कोणी रुग्ण उपचारासाठी गोमेकॉत आल्यास खचार्चा पूर्ण परतावा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारची पूर्वी राजीव गांधी आरोग्यदायी योजना होती. या योजनेचे नामांतर आता महात्मा फुले आरोग्यदायी योजना असे केलेले आहे. 

गोमेकॉत सध्या परप्रांतीय रुग्णांना गोवा सरकारच्या दयानंद स्वास्थ विमा योजनेंतर्गत ‘क’श्रेणी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी जेवढे शुल्क आकारले जाते त्याच्या २0 टक्के इतके शुल्क आकारले जाते. उदाहरणार्थ हृदयरोग विषयक कोरोनरी बल्लून अँजिओप्लास्टीला ‘क’ श्रेणी रुग्णालयात १,२७,६५0 रुपये आकारले जातात. गोमेकॉत परप्रांतीयांना केवळ २५,५३0 रुपये आकारले जातील. इतर शस्रक्रियांच्या बाबतीतही याचप्रमाणे वेगवेगळे शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. रक्त चाचण्या, अल्ट्रासाउंड, एक्स रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदींसाठी तसेच वेगवेगळ्या शस्रक्रियांसाठी शुल्क आकारणी सुरु झाली असून खाटेसाठी दिवशी ५0 रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे.

गेल्या १ जानेवारीपासून हे शुल्क लागू झालेले आहे. गोमेकॉ हे ‘अ’ श्रेणी रुग्णालयातआहे. गोमंतकीयांपेक्षा परप्रांतीयच या रुग्णालयाचा अधिक लाभ घेतात आणि त्याचा आर्थिक बोजा सरकारवर पडते, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे.  शेजारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कर्नाटकातील कारवार, कुमठा भागातून वैद्यकीय उपचारांसाठी येथे येणाऱ्यांना आता पैसे मोजावे लागतात. गोमेकॉसह म्हापशाचे जिल्हारुग्णालय, मडगांवचे ऑस्पिसियो रुग्णालय आणि फोंडा येथील सरकारी रुग्णालयांमध्येही हे शुल्क लागू झालेले आहे. 

स्थानिक गोमंतकीयांनी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येताना दीनदयाळ आरोग्य विमा योजनेंतर्गत देण्यात आलेले कार्डसोबत आणावे लागते. दरम्यान, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता केसरकर यांनी हा प्रस्ताव मांडल्याच्या वृत्तास त्यानी दुजोरा दिला ते म्हणाले की, गोव्याच्या आरोग्य विमा कार्डांप्रमाणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या आरोग्य कार्डांचा उपयोग करावा त्यासाठी गोमेकॉत कक्ष उघण्याची आमची तयारी आहे. बेळगांवला केएलई रुग्णालयात जाणाऱ्या गोमंतकीय रुग्णांनाही तेथे काउंटर उघडून अशीच व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर goaगोवाhospitalहॉस्पिटल