धक्कादायक! ज्याच्याकडे गावाची जबाबदारी, त्या सरपंचाकडून युवतीवर बलात्कार

By काशिराम म्हांबरे | Updated: May 31, 2023 12:54 IST2023-05-31T12:53:46+5:302023-05-31T12:54:12+5:30

घडलेल्या प्रकारानंतर त्या सरपंचानी पिडीत युवतीला धमकावण्यास सुरुवात केली होती. तसेच तक्रार नोंदवू नये म्हणून दबावाचाही वापर केला होता.

Shocking! A young woman was raped by the sarpanch in mhapusa, Goa | धक्कादायक! ज्याच्याकडे गावाची जबाबदारी, त्या सरपंचाकडून युवतीवर बलात्कार

धक्कादायक! ज्याच्याकडे गावाची जबाबदारी, त्या सरपंचाकडून युवतीवर बलात्कार

म्हापसा: एका युवतीवर कथीत लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी बार्देश तालुक्यातील गिरी पंचायतीच्या सरपंचाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सरपंचाने लग्नाचे आमिष दाखवून त्या युवतीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सनी नानोडकर असे त्या सरपंचाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पिडीत २१ वर्षीय युवती त्या सरपंचाजवळ कामाला होता.

घडलेल्या प्रकारानंतर त्या सरपंचानी पिडीत युवतीला धमकावण्यास सुरुवात केली होती. तसेच तक्रार नोंदवू नये म्हणून दबावाचाही वापर केला होता. त्यामुळे घाबरलेल्या त्या युवतीने म्हापसा पोलीस स्थानकावर सरपंचा विरोधात तक्रार दाखल केली आहे. केलेली तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत दाखल करून घेतली आहे. तक्रानीनंतर पोलीस नानोडकर यांच्या मार्गावर आहेत. पुढील तपास निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला आहे. 

Web Title: Shocking! A young woman was raped by the sarpanch in mhapusa, Goa