धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, संशयिताचा शोध सुरू

By सूरज.नाईकपवार | Updated: May 26, 2023 12:40 IST2023-05-26T12:40:14+5:302023-05-26T12:40:59+5:30

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Shocking! A minor girl was raped, police investigation is on, the suspect's mobile phone is switched off | धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, संशयिताचा शोध सुरू

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, संशयिताचा शोध सुरू

मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यात एका पंधरा वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणात कोलवा पोलिसांनी संशयित राहूल चंद्रा (२८) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र संशयिताचा मोबाईल फोन सध्या बंद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

संशयित मूळ पश्चिम बंगाल राज्यातील आहे. सध्या तो दवर्ली येथे राहत आहे. भादंसंच्या ३६३, ३७६, गोवा बाल कायदा कलम ८ व बाल संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.

पीडिताची आई तक्रारदार आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने तिच्या मुलीला पळवून नेऊन मडगाव येथे एका फ्लॅटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या वर्षाच्या जानेवारीपासून संशयिताने अनेकदा तसे कृत्य केले. पीडित युवती सध्या गरोदर आहे.

Web Title: Shocking! A minor girl was raped, police investigation is on, the suspect's mobile phone is switched off