शरद पोंक्षे यांचे शनिवारी गोव्यात व्याख्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:11 IST2023-06-06T12:10:39+5:302023-06-06T12:11:01+5:30

ख्यातनाम अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या हस्ते उद्घाटन होणारा आहे.

sharad ponkshe speech in goa on saturday | शरद पोंक्षे यांचे शनिवारी गोव्यात व्याख्यान

शरद पोंक्षे यांचे शनिवारी गोव्यात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : येथील विविध क्षेत्रांतील समविचारी लोकांनी एकत्र येऊन हिंदू संस्कृती न्यासाची स्थापना केली असून, सदर न्यासचे विधिवत उद्घाटन शनिवार, दि. १० रोजी संध्याकाळी ५ वाजता राजीव गांधी कलामंदिराच्या मुख्य सभागृहात होणार आहे. 

ख्यातनाम अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या हस्ते उद्घाटन होणारा आहे. यावेळी न्यासाचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, सचिव मनोज गावकर, खजिनदार अजय सावईकर व्यासपीठावर उपस्थित असतील.

उद्घाटनपर कार्यक्रम झाल्यानंतर सव्वापाच वाजता शरद पोंक्षे यांचे 'श्रीमंत बाजीराव पेशवे' या विषयावर व्याख्यान होणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी संध्याकाळी चार वाजता राजीव गांधी कलामंदिर येथे मिळतील, अशी माहिती अध्यक्ष जयंत मिरींगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गीता प्रभुदेसाई, मनोज गावकर, मशाल आडपईकर, अजय सावईकर, सदस्य लीना सावईकर, नीता जोशी, उषा टेंगसे, वसंत सुतार उपस्थित होते.

 

Web Title: sharad ponkshe speech in goa on saturday