उपराष्ट्रपतींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांची गोव्याला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 06:53 PM2017-12-16T18:53:24+5:302017-12-16T18:53:31+5:30

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी एका सोहळ्यानिमित्त गोव्याला गेल्या दोन दिवसांत धावती भेट दिली. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन ह्या आज रविवारी दाखल होत आहेत.

Several Union ministers, including the Vice President, visited Goa | उपराष्ट्रपतींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांची गोव्याला भेट

उपराष्ट्रपतींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांची गोव्याला भेट

Next

पणजी - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी एका सोहळ्यानिमित्त गोव्याला गेल्या दोन दिवसांत धावती भेट दिली. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन ह्या आज रविवारी दाखल होत आहेत.

पणजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बांबोळी येथील एका हॉटेलमध्ये  इंडिया आयडियास हा सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने विचार मांडण्यासाठी देशभरातील बडी मंडळी गोव्यात दाखल झाली. काहीजणांचा मुक्काम अजून गोव्यात आहे तर काहीजणांनी विचार मांडून झाल्यानंतर लगेच गोव्याचा निरोप घेतला. काहीजण रविवारी दाखल होत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही इंडिया आयडियासमध्ये भाग घेऊन आपले विचार मांडले.

उपराष्ट्रपती नायडू शनिवारी सकाळी दाखल झाले आणि कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर सायंकाळी ते दिल्लीस रवाना झाले. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर तसेच सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी नायडू यांचे स्वागत केले. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनीही गोव्याला भेट दिली.

दरम्यान, गोव्यात सध्या विविध प्रकारचे सोहळे सुरू आहेत. मत्स्य महोत्सव नुकताच पार पडला. सेरेंडेपीटी कला महोत्सवही सुरू आहे. या सगळ्य़ा सोहळ्यानिमित्ताने हजारो पर्यटकही सध्या गोव्यात दाखल झाले आहेत. किनारे तर गर्दीने प्रचंड फुलले आहेत.

नाताळानिमित्तानेही आकर्षक असे वातावरण सध्या गोव्यात तयार होत आहे. नववर्ष साजरे करण्यासाठीची तयारीही गोव्यात सुरू आहे. अनेक चर्चेस सुशोभित करण्यात आल्या आहेत. ख्रिस्ती बांधवांच्या घरांसमोर रोषणाई करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात विविध राज्यांमधील मंत्री तसेच बॉलिवूडमधील सिने ता:यांसह देशभरातील अनेक उद्योगपती गोव्यात दाखल होणार आहेत. गोव्यातील हॉटेलमधील खोल्या अगोदरच आरक्षित झालेल्या आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील किना:यांवर हॉटेल व्यवसायिक तसेच पर्यटनाशीनिगडीत विविध घटक सध्या नववर्ष साजरे करण्यासाठी सगळी तयारी करत आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री व दि. 1 जानेवारीला लाखो पर्यटक गोव्यात असतील. त्यावेळी संगीत महोत्सव, नृत्य रजनी, जेवणाच्या पाटर्य़ा आदी कार्यक्रम होणार आहेत. एकंदरीत सध्या गोव्यात विविध सोहळ्य़ांचाच मोसम रंगू लागला आहे.

Web Title: Several Union ministers, including the Vice President, visited Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.