शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:25 IST

आंतरराष्ट्रीय योग दिन : प्रत्येक गोमंतकीयाने योग करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धावपळीच्या युगात आज प्रत्येकाने रोज सकाळी वेळ काढून योगासने केल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होईल. त्याचबरोबर राज्यातील शाळांनीही यासाठी पुढाकार घेऊन रोज १५ मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पोलिस महासंचालक आलोक कुमार व इतर सरकारी अधिकारी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही योगसाधना केली. आपण आपल्या आयुष्यात आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब केला तर आपले कुटुंब आनंदी व निरोगी बनू शकते. प्रत्येक कुटुंबाने 'फॅमिली योगा'ची सुरुवात करावी. यामुळे आजारांवर नियंत्रण ठेवता येईल. 

वाढते मधुमेह, रक्तदाब या सारख्या आजारावर आम्ही नियंत्रण ठेऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे एकाग्रतेबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाळांमध्ये दररोज १५ मिनिटे योगाभ्यास सुरू करण्याचा सल्ला योग शिक्षकांना दिला आहे. विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने ही बाब अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

समृद्ध परंपरा...

योगाचे महत्त्व फक्त वैयक्तिक आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि शारीरिक समतोलासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज धावपळीच्या युगात, योगासारख्या शाश्वत आणि शिस्तबद्ध प्रणालीच्या माध्यमातून आपण संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. ही केवळ प्राचीन परंपरा नाही, तर आजच्या काळातील गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

योगसाधना गरजेची : राणे

योगातून ऊर्जा, शिस्त आणि आनंद मिळत असतो. त्यामुळे योग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील आरोग्य आणि एकतेची ताकद बनला आहे, असे उद्‌गार आरोग्य मंत्री विश्वजित राणे काढले. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. मात्र, आज ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण साधना बनली आहे. गोव्यातून या जागतिक चळवळीचा भाग होणे हा गौरवाचा विषय असून, ही भावना पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मंत्री विश्वजित राणे म्हणाले.

जगालाही पटले योगाचे महत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व जगभर पोहचविले आहे. त्यामुळे जात, धर्म, देश, भाषा या सर्व सीमापार करुन योग आता जगभर पोहोचला आहे. जगातील सर्व देश आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहेत. यातून आमची भारतीय संस्कृती आता जगभर पोहचली आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंतInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन