संभाजी भिडे गुरूजी यांनी घेतली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:29 IST2026-02-09T11:27:36+5:302026-02-09T11:29:01+5:30
संभाजी भिडे गुरूजी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन संवाद साधला.

संभाजी भिडे गुरूजी यांनी घेतली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: संभाजी भिडे यांनी काल साखळी येथील पद्मिनी फाउंडेशनच्या साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की, भिडे गुरूजी देश, धर्म तसेच शारीरिक सुदृढतेच्या मूल्यांवर भर देत युतकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि शिस्तीची भावना जागवण्याचे मोठे कार्य करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत त्यांचे युवकांना मार्गदर्शन चालू आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुरुजींचे विचार आजच्या तरुण पिढीला संस्कृतीचा अभिमान, राष्ट्रभक्ती आणि आत्मशिस्त यांची जाणीव करून देतात. अशा विचारवंत व्यक्तिमत्त्वांचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडत असून, युवकांना योग्य दिशेने नेण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे.
भेटीदरम्यान सांस्कृतिक, सामाजिक, युवकांच्या सक्षमीकरणासंदर्भातील विषयांवर चर्चा झाली. गुरूजी सातत्याने युवकांना प्रेरणा देतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.