लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात व उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली. मनपा सभागृहात सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत या पदांच्या निवडीसाठी बैठक झाली. मात्र, विरोधकांकडून कुणीही या पदांसाठी अर्ज केला नसल्याने मोन्सेरात व आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर आयुक्त क्लेन मदेरा यांनी दोघांचे अभिनंदन केले. दरम्यान, नागरिकांच्या सुविधांना आपले प्राधान्य आहे. गॅस पाइपलाइनच्या कामासाठी शहरातील रस्ते फोडण्यास आपली हरकत असल्याचे यावेळी महापौरांनी स्पष्ट केले.
रोहित हे मनपावर २०२१ पासून महापौरपद भूषवत आहेत. ते सहाव्यांदा महापौर बनले. तर आगशीकर तिसऱ्यांदा उपमहापौरपदी निवडले गेले. एकूण ३० पैकी २७ नगरसेवक मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलचे आहेत. तर उर्वरित तीन उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजीकर पॅनलकडून निवडून आले आहेत.निवडीनंतर महापौर मोन्सेरात म्हणाले की, 'गॅस पाइपलाइनच्या कामासाठी सरकारने शहरातील रस्ते कम्पनी सरकार खोदण्यास परवानगी दिली आहे.
महानगरपालिका या निर्णयाशी सहमत नाही. आम्हाला नागरिकांच्या सुविधा, सोयी महत्त्वाच्या आहेत. त्याला प्राधान्य देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे रस्ते खोदण्यास आमचा विरोध आहे. स्मार्ट सिटी योजनेची कामे शहरात सुरू असतानाच त्यांनी गॅस पाइपलाइनचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, तसे करण्याऐवजी वारंवार या कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केल्यास लोकांची मोठी गैरसोय होईल,' असे त्यांनी नमूद केले.
उपमहापौर आगशीकर म्हणाले, 'मनपावर निवडण्यात आलेले बहुतांश नगरसेवक अनुभवी आहेत. मला पुन्हा उपमहापौरपदी संधी देण्यासाठी सर्वांचे आभार. शहरातील नागरिकांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'
Web Summary : Rohit Monserrat and Vasant Agashikar were unanimously elected as the Mayor and Deputy Mayor of Panaji. Monserrat, serving his sixth term, opposes further road digging for gas pipelines, prioritizing citizen convenience. Agashikar, re-elected as Deputy Mayor, pledges commitment to the city's residents, supported by experienced councilors.
Web Summary : रोहित मोनसेरात और वसंत आगशीकर पणजी के महापौर और उपमहापौर निर्विरोध चुने गए। मोनसेरात, अपने छठे कार्यकाल में, गैस पाइपलाइनों के लिए आगे सड़क खुदाई का विरोध करते हैं, नागरिक सुविधा को प्राथमिकता देते हैं। आगशीकर, उपमहापौर के रूप में फिर से चुने गए, अनुभवी पार्षदों के समर्थन से शहर के निवासियों के लिए प्रतिबद्धता का संकल्प लेते हैं।