शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

जलवाहतुकीचे हक्क राज्याकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:31 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : ६ नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे प्रस्ताव असले तरी आतापर्यंत झालेल्या दोन करारात नद्यांतील वाहतुकीचे अधिकार हे राज्य सरकारकडेच

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : ६ नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे प्रस्ताव असले तरी आतापर्यंत झालेल्या दोन करारात नद्यांतील वाहतुकीचे अधिकार हे राज्य सरकारकडेच ठेवण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिली. राष्ट्रीयीकरणावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. कॉँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रस्तावावर केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे. आतापर्यंत दोन महत्त्वाचे करार झालेले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट या तिन्ही पार्टींच्या झालेल्या एका करारात नद्यांतील वाहतुकीचे अधिकार हे राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. अजून काही करार राहिले आहेत, असे त्यांनी सांगितले. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणामुळे एकूण १३ नवीन जेटी गोव्याला मिळणार आहेत. ४ जेटी या फ्लोटिंग स्वरूपाच्या असणार आहेत. उर्वरित ९ जेटींचा खर्च सागरमाला प्रकल्पातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नदी उपसा करताना नदीतील गाळ खाजनशेतीत जाऊन शेती नष्ट होण्याची भीती रेजिनाल्ड यांनी व्यक्त केली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एवढ्यात चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले; कारण नद्यांचा उपसा करण्याची गरज असली तरच तो केला जाणार आहे.