शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भोमवासियांच्या न्यायासाठी आरजी प्रमुखांनी घेतली एसटी आयुक्तांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 16:57 IST

लोकांना न्याय देण्यासाठी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब भोमवासियांना घेउन एसटी आयुक्तांकडे धाव घेतली.

नारायण गावस,पणजी: बुधवारी भोम गावात राष्ट्रीय महामार्गच्या अभियंत्यांना सिमांकन करताना जाब विचारायला गेलेल्या भोमवासियांना बळजबरीने अटक करून कुळे पोलिस स्थानकात त्यांच्याशी अमानुषपणे वर्तन करण्यात आले.  तसेच लाठी चार्ज करण्याची धमकीही देण्यात आली. याच्या निषेधार्थ या लोकांना न्याय देण्यासाठी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब भोमवासियांना घेउन एसटी आयुक्तांकडे धाव घेतली. यावेळी आरजीचे आदिवासी संघटनेचे  प्रमुख प्रेमानंद गावडे, दिनेश गावडे, अजय खोलकर उपस्थित होते.

आरजी प्रमुख मनोज परब म्हणाले जेव्हा राष्ट्रीय महामार्गचे अभियंते सिमांकन करण्यासाठी भोम गावात आले तेव्हा लोकांनी त्यांना फक्त कागद पत्रे व स्पष्टीकरण देण्यास सांगितले परंतु अधिकाऱ्यांकडे कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना काम बंद करण्याची विनंती केली. फक्त एवढ्याच कारणामुळे भोमवासियांना जबरदस्तीने अटक  केली. हे सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले कृत्य लज्जास्पद असून त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे.

 मनोज परब म्हणाले, आज जेव्हा भोमवासिय लोक आपली घरे, संसार उद्ध्वस्त होताना पाहत आहे, आणि ते वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु या सरकारला त्यांची पर्वा नसून त्यांना फक्त निवडणुकीसाठीची हे लोक हवे आहेत.  स्वत:ला एसटी समाजाचा नेता, म्हणणारा हा प्रियोळ मतदारसंघाचा आमदार मंत्री  गोविंद गावडे आता कुठे गेला आहे. आज एसटी समाजाच्या लोकांवर अन्याय होत असताना आता तो ह्या भोमवासियाना वाचविण्यासाठी त्यांचा संसार, त्यांची घरे वाचविण्यासाठी का पुढे येत नाही? हे सरकार हे गोवेकरासाठी नसून फक्त मोठ्या बिल्डर लॉबीसाठी असल्याचेही मनोज परब म्हणाले. 

या भेटीदरम्यान एसटी आयुक्तांना त्यांनी स्वतः याची कडक कार्यवाही करून , घटनास्थळी पाहणी करून गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती मनोज परब यांनी केली असता, आम्ही स्वतः ह्याकडे गंभीरतेने लक्ष देणार असून, घटनास्थळी पाहणी करून, लोकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे एसटी आयुक्त दीपक करमरकर यांनी सुद्धा सकारात्मक आश्वासन देत म्हटल्याचे मनोज परब यांनी माहिती दिली.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस