शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

सभापतींना हटवा, काँग्रेसच्या 16 आमदारांकडून विधानसभेत नोटीस  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 7:54 PM

पणजी : सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून हटविण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व 16 आमदारांनी शुक्रवारी विधिमंडळ खात्याच्या सचिवांकडे नोटीस दिली आहे. मात्र, ही नोटीस कायद्याला धरून नाही असे सभापतींचे म्हणणे आहे. त्यामुळे या नोटिसीचे भवितव्य येत्या आठवड्यात ठरेल, असे सुत्रांनी सांगितले.काँग्रेस पक्ष गेले काही दिवस सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणून ...

पणजी : सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून हटविण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व 16 आमदारांनी शुक्रवारी विधिमंडळ खात्याच्या सचिवांकडे नोटीस दिली आहे. मात्र, ही नोटीस कायद्याला धरून नाही असे सभापतींचे म्हणणे आहे. त्यामुळे या नोटिसीचे भवितव्य येत्या आठवड्यात ठरेल, असे सुत्रांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष गेले काही दिवस सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणून सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडण्यासाठी रणनिती आखत आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे याच कामात व्यस्त असून त्यांचा आल्तिनला मुक्काम असतो. याच रणनीतीचा भाग म्हणून पहिले पाऊल उचलताना काँग्रेसने आता सभापती सावंत यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे, असे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे.

आम्ही दिलेल्या नोटीसीचा चौदा दिवसांचा कालावधी संपला की, आम्ही प्रमोद सावंत यांना सभापती पदावरून हटविण्यासाठी ठराव मांडणार असल्याचे काँग्रेसने नोटीसमध्ये म्हटले आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार प्रतापसिंग राणो, दयानंद सोपटे, सुभाष शिरोडकर, जेनिफर मोन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रीग्ज, आलेक्स रेजिनाल्ड आदी सर्व 16 आमदारांच्या सह्या या नोटिशीवर आहेत.

नोटिशीला अर्थ नाही : सावंत

दरम्यान, सभापती सावंत यांना लोकमतने प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की, सध्या विधानसभा अधिवेशन सुरू नाही. विधानसभा अधिवेशन अलिकडेच पार पडले आहे. त्यामुळे आणखी पाच महिने काही अधिवेशन घ्यायची गरज राहिलेली नाही. अधिवेशन सुरू नसताना सभापतींविरुद्ध नोटीस देता येते का, हे काँग्रेसच्या आमदारांनी अगोदर जाणून घेतले तर बरे होईल. ही नोटीस नियम व कायद्याला धरून नाही एवढेच मी तूर्त सांगू शकतो. सत्ताधारी आघाडीतील कुठलाच घटक पक्ष सरकारला सोडून गेलेला नाही. कुणी पाठिंबा मागे घेतलेला नाही.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPresidentराष्ट्राध्यक्ष